‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाणे सोशल मिडीयावर व्हायरल


मराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम सॉंग बघितले आहे, त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचित प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम सॉंग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत.आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो.


आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स चाहत्यांना दिसणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. आजवर अतिशय सौम्य शब्दांची गाणी लिहिणाऱ्या प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे.


चित्रपटातील हे गाणे मनोरंजन करणारे असले तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा व वास्तववादी स्थिती मांडणारा आहे.


Originally published at Marathi PR.

माधवी निमकरने साजरा केला गणेशोत्सव


भोसरी येथे अशोक देशमाने, परभणी-लातूर-बीड या ठिकाणी जाऊन आत्महत्या केलेल्या, आई वडील नसणाऱ्या, शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे पालकत्व घेतात, त्यांची ही संस्था भोसरी येथे कार्यरत आहे.
दरवर्षी गणपतीच्या आरती निमीत्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बोलवून त्यांच्या हस्ते आरती व मुलांना मार्गदर्शन केले जाते. प्रमुख पाहुणे म्हणुन अभिनेत्री माधवी निमकर यांना बोलवण्यात आले होते. या वेळी बाप्पाच्या आरती नंतर माधवीने मुलासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांना आपल्या आयुष्यातील गणपती आणि इतर गोष्टीच्या आठवणी सांगितल्या. तसेच मुलांना काही भेटवस्तु दिल्या. यावेळी अशोक देशमाने यांच्या वतीने त्यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.


Originally published at Marathi PR.

धैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा


गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी ‘बॉईज २’ मध्ये देखील दिसून येणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला.


‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ असे टॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर ‘बॉईज’ सिनेमातील तीच अतरंगी पोरं आपल्याला दिसून येत आहेत. शाळेतून आता महाविद्यालयात गेलेल्या या तिघांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मार जरी दिसत असला तरी, त्यांची मस्ती अजून काही कमी झाली नसल्याचे, त्यांच्या हास्यातून कळून येते. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमातून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड,प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा डबल धमाका घेऊन येत आहेत.

येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे संवाद-लेखन ऋषिकेश कोळीने लिहिले असून; लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी ‘बॉईज २’ च्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. तसेच, इरॉस इंटरनॅशनलद्वारे ‘बॉईज २’ चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


Originally published at Marathi PR.

‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००


कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक लवकरच ३०० व्या प्रयोगाचा महत्वपूर्ण टप्पा गाठणार आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ करणाऱ्या या नाटकाचा, ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये, रविवार, दि. १२ रोजी त्रिशतक महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. पती-पत्नीच्या स्ट्रेसफुल आणि तितक्याच गोजिऱ्या नात्यावर भाष्य करणारे हे नाटक रसिकप्रेक्षकांच्या मनात आजही मोहिनी घालण्यास यशस्वी ठरत आहे. कारण, आजच्या बहुमाध्यमांच्या काळात एखादे नाटक ३०० वा प्रयोगांपर्यंत मजल मारणे हि खरच असाध्य गोष्ट असून, या नाटकाने ते साध्य करून दाखवले आहे.सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित,मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील, उमेश कामत आणि स्वानंदी टिकेकर हि जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरत आहे.या नाटकाचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास पाहता, स्पृहा जोशीने गाजवलेल्या प्रणोती पात्राला स्वानंदी टिकेकरने चांगलाच न्याय दिला असल्याचे पाहायला मिळते आहे. कारण, स्वानंदीच्या रूपातली ही नवी प्रणोती पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा नाटक पाहण्यास येत असल्याचे दिसून येत आहे.

https://imgur.com/zMIDYYu

आजच्या तरुण पिढीच्या वैवाहिक जीवनाची व्यथा सांगणाऱ्या या नाटकाने अनेक वैवाहिक दाम्पत्यांसाठी काऊन्सिलिंगचे काम केले आहे. वर्कहोलिक जगात स्वतःसाठी वेळ काढू न शकणाऱ्या जोडप्यांना हे नाटक एकत्र आणण्यास यशस्वी ठरत असून, यापुढेदेखील हे नाटक आपले कार्य असेच कायम राखत, ४०० चा पल्ला गाठेल अशी अपेक्षा केल्यास काही वावगे ठरणार नाही.


Originally published at Marathi PR.

सोशल मीडियावर “भावड्या”ची चर्चा


“३ ऑगस्ट ला येतोय भावड्या” सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे, कोण आहे हा भावड्या ? सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालतोय हा, त्याच्या येण्याचे अनेक टीझ वायरल होत आहेत… सगळयांनाच त्याच्या येण्याची उत्सुकता लागून राहिली आहे, पण काहीच कळत नाही आहे…

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही लोक अशा पोस्ट सोशल मीडियावर share करताना आढळलेले… ३ ऑगस्ट ला खरंतर बहुचर्चित पुष्पक विमान चित्रपट रिलीज होतो आहे. सुरुवातीला हे त्याच्याशी निगडित काही असेल अशी शंका काहींना आली त्यातूनच भावड्या कडून पुष्पक विमान टीमला शुभेच्छा अशीही पोस्ट आली.


पण मग “पार्टी” चित्रपटाचे कलाकार-तंत्रज्ञसुद्धा ह्या भावड्याच्या पोस्ट करू लागले. भावड्या असं करेल… भावड्या तसा आहे… संध्याकाळी “पार्टी” चित्रपटाच्या Official हॅन्डलवरून रवी जाधव यांना टॅग करून,

“भावड्या” गरीब असला म्हणून काय झाले, “भावड्या”च्या मनाची श्रीमती अपरंपार आहे, चला हवा येउ द्या!


आणि तेजश्री प्रधान ला टॅग करून ती सध्या काय करते “भावड्या” ची वाट बघते


ट्विटर इंस्टाग्राम वर सुद्धा काही मोठी अकाउंट्स जास्त फॉलोवर्स असणारे अशा अनेक “भावड्या” पोस्ट्स share करताना आढळले


एकंदरीत “भावड्या” ची चर्चा खूप सुरु आहे…आता वाट पहावी लागणार 3 तारखेची… काय असेल कोण असेल भावड्या ते त्याच दिवशी कळेल…


Originally published at Marathi PR.

दोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर


प्रत्येकांच्या आयुष्यात ‘मित्र’ हा असतोच! सुख-दु:खांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी ‘पार्टी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमाचा सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच टीझर लाँँच करण्यात आला.

‘पार्टी’ च्या टीझरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या मराठीतील प्रसिद्ध युवा कलाकारांची झलक आपल्याला पाहायला मिळते. सहाजणांची रंजक गोष्ट आणि त्यांचे गमतीशीर किस्से या टीझरमध्ये आपल्याला दिसून येतात. या सिनेमाच्या टीझरवरून हा सिनेमा धम्माल विनोदी चित्रपट असल्याची जाणीव होते.


प्रत्येक नाक्या-नाक्यावर आढळणाऱ्या ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘फ्रेन्डशिप डे’च्या महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या ‘पार्टी’त सहभागी होण्यास प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.Originally published at Marathi PR.

मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या ‘पार्टी’चा पोस्टर लाँच


मैत्रीचा हँगओव्हर चढवणारा सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या ‘पार्टी’चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला.


धम्माल ‘पार्टी’ चा फील येत असलेल्या, या सिनेमाच्या कलरफुल पोस्टरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला हे मराठीतील प्रसिद्ध युवाकलाकार आपल्याला दिसून येतात. या सिनेमाच्या नावातच ‘पार्टी’ असल्यामुळे, सहाजणांच्या हटके मैत्रीवर हा सिनेमा आधारित असल्याचा अंदाज येतो.

नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख या तीकडीने मिळून ‘पार्टी’ सिनेमाची निर्मिती केली आहे.

ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री घेऊन येत असलेली ही ‘पार्टी’ खास मैत्रीच्या महिन्यात आयोजित केली असल्यामुळे, प्रेक्षकांसाठी हा सिनेमा फ्रेन्डशिप डेची सरप्राईज ‘पार्टी’च ठरणार आहे, हे नक्की !


Originally published at Marathi PR.

‘पुष्पक विमान’ची ३ ऑगस्टला भरारी


आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्तांची सर नाही आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. तो असल्यावर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ह्या वर्षात ये रे ये रे पैसा, गुलाबजाम आणि न्यूड सारखे चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओज् ची प्रस्तुती असलेल्या सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपट ‘पुष्पक विमान’, ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष. नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. ह्या सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओज् चे शारिक पटेल, मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

चित्रपटाची कथा आहे विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांची. तात्या जळगाव मध्ये राहणारे वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्व. कीर्तन, भजन आणि शेती ह्यात आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन हि कथा नेहमीच भुरळ घालत असे. हेच तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, तात्या पहिल्यांदा अगदी जवळून उडणारे विमान पाहुन भारावून जातात. आयुष्यभर कीर्तनातून ‘तुकाराम महाराजांचा पुष्पक प्रवास’ आनंदाने सांगणाऱ्या तात्यांसाठी हि घटना कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या इरसाल पण निरागस विश्वात कल्लोळ माजतो. भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी एक गाथा म्हणजेच ‘पुष्पक विमान’


मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चेतन सैंदाणे यांचे असून, कथा सुबोध भावे यांची आहे. पटकथा व दिग्दर्शन वैभव रा. चिंचाळकर यांचे आहे. चित्रपटाचं संकलन केलंय आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी तसेच धावणाऱ्या मुंबईला आपल्या छायाचित्रणात सुरेखपणे टिपलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेते छायालेखक महेश आणे यांनी. संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन असून चित्रपटाला संतोष मुळेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांची संगीतबद्ध केली असून शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणि नकाश अझीझ यांनी स्वरबद्ध केली आहेत तर समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्मात्याची धुरा रत्नकांत जगताप यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी किरण आणि सुयश झुंझूरके हे कलाकार आहेत तसेच राहुल देशपांडे एका खास भूमिकेत दिसणार आहेत.


Originally published at Marathi PR.

‘वन्स मोअर’ मराठी चित्रपटाचे पोस्टर


वंशिका क्रिएशन्स आणि देवस्व प्रोडक्शन प्रस्तुत, लवांडे फिल्म्स आणि विष्णू मनोहर एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने ‘वन्स मोअर’ हा मराठी चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात ३१ तारखेपासून नरेश बीडकरांच्या या अनोख्या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला.Originally published at Marathi PR.

‘सत्यमेव जयते’ मध्ये अमृता खानविलकरची भूमिका


आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या अमृता खानविलकरला २०१८ हे वर्ष खूपच यशदायी ठरत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ या चित्रपटातील तिच्या उर्दू लहेजाचे सर्वत्र कौतुक झाले होते. समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचला आहे. तसेच तिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅमेज्ड’ या वेब सिरीजने नुकताच १० मिलीअन व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे, त्यामुळे सध्या ही गुणी अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
‘राझी’ मधील शांत आणि सुस्वभावी अशी ‘मुनिरा’ आणि ‘डॅमेज्ड’ या वेब सिरीजमधील अंगावर शहारा आणणारी सीरिअल किलर ‘लोव्हीना’ साकारल्यानंतर अमृता आता मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात ती ‘सरिता’ हे मनोज वाजपेयी यांच्या पत्नीचे पात्र साकारत आहे.
Originally published at Marathi PR.