‘फुंतरू’चा प्रीमियर Star प्रवाह वर

मराठीतली पहिली साय-फाय लव्हस्टोरी पहा ‘स्टार प्रवाह‘वरमराठी इतकाच बॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फुंतरू’ या मराठी चित्रपटातून मराठीत पहिलीच सायन्स फिक्शन लव्हस्टोरी सादर करण्यात आली. मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आता स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून ३० एप्रिल रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘फुंतरू’ची कथा […]

F.U. टीझर लॉन्च सोहळा

एनर्जी, रोमान्स, तरुणाईचा ऍटिट्यूट आणि फुल्ल टू जल्लोषने भरलेल्या बहुचर्चित F.U.-Friendship Unlimited या चित्रपटाचा भव्य टीझर लॉन्च सोहळा रंगला सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि सोशल मीडियावर काही तासांत १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले. ‘सैराट’च्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषतः तरुणाईच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटातून एका ट्रेंडी […]

सुमीत राघवनचा एक वाढदिवस असाही…

नाटक “एक शून्य तीन” चा एक नेहमीप्रमाणेच ठरलेला प्रयोग शनिवार २२ एप्रिल दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे.“एक शून्य तीन” आशयघन नाट्यकृती… नवोदित दिग्दर्शकांचा प्रयोगशील प्रयत्न…स्वानंदी टिकेकरचं पहिलंच नाटक…सामाजिक संदेश देण्याचा यथायोग्य प्रयत्न करून प्रेक्षकांच्या हमखास पसंतीस पडलेलं यापलीकडे ह्या नाटकाचं आणखी एक विशेष सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे “सुमीत राघवन” ह्यांचा सहज सुरेख अभिनय…तसं पाहिलं […]

एक सुखद ट्रीट : सायकल

“सायकल” , दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा कॉफी आणि बरंच काही, & जरा हटके यांसारख्या चित्रपटानंतर येणारा हा सिनेमा थेट सन्माननीय पुरस्कारांच्या यादीत जाऊन बसलाय. त्यांच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली होती. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाईसुद्धा केली होती. आणि “& जरा हटके” या चित्रपटाद्वारे त्यांनी एक मॅच्युर्ड लव्हस्टोरी मांडली […]

विक्रम गोखले, अरुण नलावडे यांना राज्याचा ‘जीवनगौरव’

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्य शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना दरवर्षी राज्य शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सायरा बानो यांना ‘राजकपूर जीवनगौरव’, तर विक्रम गोखले यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार […]

TTMM चित्रपटाचे दुसरे टीझर पोस्टर रिलीज

ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांची जोडी असलेला TTMM — “तुझं तू माझं मी” या चित्रपटाचा नुकताच दुसरा टीझर पोस्टर त्यांच्या फेसबुक पेजवर रिलीज करण्यात आला. पहिल्या टीझर पोस्टरमधून प्रेक्षकांना समुद्रकिनारी असलेल्या ललित आणि नेहा यांचा पाठमोरा फोटो पाहायला मिळाला. त्यात ते दोघेही बॅगपॅक्स घेऊन आहेत. नुकताच रिलीज झालेल्या टीझर पोस्टरमध्ये देखील पहिल्या टीझर पोस्टरमधील २ गोष्टी […]

मराठी मालिकाही हिंदीच्या तोडीस तोड

‘नकुशी’चे सिनेमॅटोग्राफर बाळू दहिफळे यांचं मत ‘मराठी मालिकांमध्ये खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत. सध्या मराठी मालिका हिंदीच्या तोडीस तोड काम करत आहेत,’ असं मत हिंदी टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर असलेल्या बाळू दहिफळे यांनी व्यक्त केले आहे. बाळू दहिफळे यांनी स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ या मालिकेचं छायांकन करून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. पैठणचे सुपुत्र असलेल्या […]

अशी सापडली शेरनाझ!

स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’मध्ये शिविका तनेजा स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेत शेरनाझच्या एंट्रीनं कथानकाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र, शेरनाझच्या भूमिकेसाठीची निवड प्रक्रिया फारच गमतीशीर होती. बराच काळ शोध घेतल्यानंतर शेरनाझच्या भूमिकेसाठी शिविका तनेजाची निवड झाली. ग्लॅमरस असलेली शिविका ही भूमिका साकारते आहे. मालिकेचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि टीम शेरनाझच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. जवळपास २०पेक्षा जास्त […]

स्टार प्रवाहवर दर शनिवारी ‘तुफान आलंया’चं प्रसारण

सुपरस्टारपदावर विराजमान असूनही सामाजिक प्रश्नांचं भान असलेला अभिनेता आमीर खाननं महाराष्ट्रातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. सहजसोप्या पद्धतीनं दुष्काळमुक्ती करण्यासाठी ‘वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेच्या रुपानं चळवळ सुरू झाली. गेल्या वर्षी ३ तालुके आणि ११६ गावांमध्ये रंगलेली वॉटर कप स्पर्धा यंदा ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये रंगणार आहे. दुष्काळाशी लढणाऱ्या या गावांचे प्रयत्न दाखवणारा ‘तुफान आलंया’ हा […]

अमेय आणि आकाश आमने-सामने

गेल्याच वर्षी ‘सैराट’ या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालेला आकाश ठोसर महेश मांजरेकर यांच्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहेच. या सिनेमाचं शूट तसं पूर्ण झालेलं आहे. या सिनेमाबद्दल सलमान खानने ट्विट देखील केलेले आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘ध्यानीमनी’ चित्रपटाला बॉलिवूडमधील कलाकार अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता […]