TTMM चित्रपटाचे दुसरे टीझर पोस्टर रिलीज

ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांची जोडी असलेला TTMM — “तुझं तू माझं मी” या चित्रपटाचा नुकताच दुसरा टीझर पोस्टर त्यांच्या फेसबुक पेजवर रिलीज करण्यात आला.


पहिल्या टीझर पोस्टरमधून प्रेक्षकांना समुद्रकिनारी असलेल्या ललित आणि नेहा यांचा पाठमोरा फोटो पाहायला मिळाला. त्यात ते दोघेही बॅगपॅक्स घेऊन आहेत. नुकताच रिलीज झालेल्या टीझर पोस्टरमध्ये देखील पहिल्या टीझर पोस्टरमधील २ गोष्टी एकसारख्या आहेत त्या म्हणजे — समुद्र आणि त्यांचे बॅकपॅक्स आणि त्यामुळे हा पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या टीझर पोस्टरमध्ये दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही आहेत.


कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एंटरटेनमेंट व वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत TTMM चित्रपट १६ जून २०१७ रोजी प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *