एक सुखद ट्रीट : सायकल

“सायकल” , दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा कॉफी आणि बरंच काही, & जरा हटके यांसारख्या चित्रपटानंतर येणारा हा सिनेमा थेट सन्माननीय पुरस्कारांच्या यादीत जाऊन बसलाय. त्यांच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली होती. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाईसुद्धा केली होती. आणि “& जरा हटके” या चित्रपटाद्वारे त्यांनी एक मॅच्युर्ड लव्हस्टोरी मांडली होती. या दोन चित्रपटांच्या यशामुळे प्रकाश कुंटे यांच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा तर आहेतच पण प्रदर्शनापूर्वीच राज्यशासनाच्या पुरस्काराचे मानकरी, कोल्हापूर चित्रपट फेस्टिव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान आणि आता कान्स फेस्टिव्हल मध्ये अधिकृत प्रवेश मिळवला आहे… प्रकाश कुंटे यांचा दिग्दर्शक म्हणून प्रवास यशस्वी होताना पाहून, एका सहज सोप्या भाषेतून… चित्रपटाच्या माध्यमातून… हळुवारपणे एखादा विषय मांडणारा… हाताळणारा… प्रयोगशील दिग्दर्शक प्रेक्षकांना मिळालाय हे वेगळं सांगायची गरज नाही.


सायकल या चित्रपटाचे पोस्टर पहिले असता या पोस्टरमध्ये आपल्याला भाऊ कदम, हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसतात. हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट असणार आहे हे पोस्टरवरूनच कळतय. या पोस्टरमध्ये प्रियदर्शन आणि भाऊ कदम दोघेही साधूंच्या कपड्यात आहेत. हे दोघे भोंदू बाबाची व्यक्तिरेखा साकारत आहेत का हा प्रश्न हा पोस्टर पाहून नक्कीच पडतोय. या पोस्टरमध्ये प्रियदर्शन, हृषिकेश, भाऊ हे तिथेही सायकलवर बसलेले दिसत आहेत. प्रियदर्शनने भाऊला डबल सीट घेतले आहे तर हृषिकेश विरुद्ध दिशेने बसलेला आहे. हृषिकेश सदरा आणि कोटात दिसत असून या दोघांकडे पाहून त्याला भलामोठा प्रश्न पडला आहे असे या पोस्टमधून स्पष्ट दिसत आहे.चित्रपटाचे नाव ‘सायकल’ यावरुन अजून कथेचा अंदाज येत नसला तरी काहीतरी भन्नाट अनुभवयाला मिळणार याची मात्र कल्पना येते.


‘सायकल’ हा माझा आगामी मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट कॉमेडी तर आहेच पण या चित्रपटात सामाजिक परिस्थितीवर विनोदी पध्दतीने एक संदेश देण्यात आला आहे. विनोदी चित्रपट बनवणे हा माझा पहिलाच प्रयोग आहे. या सिनेमात ह्रषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम, दिप्ती लेले यांच्या भूमिका आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा मला धमाल अनुभव मिळाला आहे. ‘सायकल’ म्हणजे नक्की काय आहे आणि कशाशी संबंधित आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल असं स्वतः दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांना सांगितलं आहे.

अमलेंदू चौधरी यांना सायकल चित्रपटासाठी राज्यशासनाच्या घोषित पुरस्कारांत मिळालेला सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार आणि सुबोध लवलेकर यांना मिळालेला सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा राष्ट्रीय पुरस्कार आणि कान फेस्टिव्हल साठी निवड हे उत्कृष्ट कथानकासोबत प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहणं म्हणजे एक सुखद ट्रीट असणार आहे अशीच शक्यता निर्माण करतंय.

Cast : Hrishikesh Joshi, Bhalchandra Kadam, Priyadarshan Jadhav, Deepti Lele, Manoj Kolhatkar, Maithilee Patwardhan

Produced By: Sangram Surve, Amar Pandit
Directed By: Prakash Kunte
Executive Producer: Avinash Bhanushali

Editor: Mayur Hardas
Director Of Photography: Amalendu Chaudhary
Written By: Aditi Moghe
Associate Producers: Rajiv Kottomtharayil, Luv Bhatt

Publicity Design: Think Why Not
VFX & Titles: Parthsarthi Ayar
DI: Prime Focus Limited
Business Head ( All India ): Nishant Sanghai
DI President: Krishna Shetty
Colorist: Makarand Surte
DI Technical Supervisor: Sudhakar Danturi
DI Production Head: Nirmal Gala
Associate Directors: Swapnil Shivaji Warke, Vishal Modhave
Direction Team: Hemant Kudale, Prashant Naik, Niket Halve
Make-Up: Nilesh Sonawane
Costumes Stylist: Sachin Lovalekar
Art: Mahesh Gurunath Kudalkar
Sound Design: Manoj V. Mochemadkar, Sandeep S. Madkholkar
Mixing Engineer: Manoj V. Mochemadkar [Shivam Sound Studio]
Original Sound Track: Aditya Bedekar
Lyrics : Mangesh Kangane
Singers : Sagar Phadke

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *