सुमीत राघवनचा एक वाढदिवस असाही…

नाटक “एक शून्य तीन” चा एक नेहमीप्रमाणेच ठरलेला प्रयोग शनिवार २२ एप्रिल दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे.
“एक शून्य तीन” आशयघन नाट्यकृती… नवोदित दिग्दर्शकांचा प्रयोगशील प्रयत्न…स्वानंदी टिकेकरचं पहिलंच नाटक…
सामाजिक संदेश देण्याचा यथायोग्य प्रयत्न करून प्रेक्षकांच्या हमखास पसंतीस पडलेलं यापलीकडे ह्या नाटकाचं आणखी एक विशेष सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे “सुमीत राघवन” ह्यांचा सहज सुरेख अभिनय…
तसं पाहिलं तर “सुमीत राघवन” हे मराठीत कमी आणि हिंदी मध्येच मोठ्या पडद्यावर…जाहिरातीत…वेबसीरीज मध्ये आणि हिंदी मालिकांमधून सर्वाना जास्त परिचित आहेत. तसे मराठी नाटकातून त्यांना आता सहज प्रत्यक्ष पाहणं… भेटणं… “एक शून्य तीन” मुळे शक्य झालं असलं तरीही २२ एप्रिलच्या “एक शून्य तीन” च्या प्रयोगाचं आयोजन काही वेगळंच होतं…


नॉर्मली मराठी नाटकांना सन्माननीय प्रेक्षक हे २५ वा प्रयोग, ५० वा प्रयोग ७५/१०० अशा वेळीच हजर असतात… पण एक शून्य तीन नाटकाच्या २२ एप्रिल च्या प्रयोगाची रंजकता आणि निमित्त काही वेगळंच होतं…
सन्माननीय आशुतोष गोवारीकर, महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सतीशजी शहा, तारक मेहता फेम श्री. दिलीप जोशी, साराभाई चे निर्माते /अभिनेते जे.डी.मजेठिया, साराभाई चे रोशेष-राजेश कुमार व्हेंटिलेटर चित्रपटाचे सन्माननीय दिग्दर्शक राजेश मापुस्कर , जयवंत वाडकर, आणि सचिन खेडेकर यांसारखी दिग्गज मंडळी आवर्जून हया पार्ल्या च्या दीनानाथ नाट्यगृहात उपस्थित होते ते त्यांच्या लाडक्या सहृदयी सन्मित्र सुमीत राघवन यांच्या वाढदिवशी त्याचा सहज पण उत्कृष्ट अभिनय पहायला…एवढी सन्माननीय मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित राहिली…नाटक पाहिलं…बर्थडे केक कापला..Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *