गजेंद्र अहिरे यांचा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ २९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच खूप काही देऊन जातात आणि म्हणूनच प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. पण आता प्रेक्षकांना जास्त वेळ वाट नाही पाहावी लागणार कारण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गजेंद्र अहिरे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ची घोषणा केली आहे आणि त्याच सोबत या चित्रपटाचा टिझर पोस्टर देखील रिलीज केला आहे.स्मिता फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि विनय गानू निर्मित हा चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चोखंदळ प्रेक्षकांसाठी हा वेगळा आशय असलेला चित्रपट नक्कीच मेजवानी ठरेल. या चित्रपटातील प्रमुख कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यातच आहे पण सिनेमाचं नाव आणि टिझर पोस्टर मात्र त्याबद्दलची उत्सुकता अजूनच वाढवतो यात शंकाच नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *