“एक शून्य तीन” नाटकाचे दिमाखदार ५० प्रयोग

ज्येष्ठ दिग्गज कलाकार एकत्र आले “एक शून्य तीन” नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगाच्या निमित्ताने…

“एक शून्य तीन” एक ज्वलंत, उत्कांठावर्धक रहस्यमय नाटक. ६ मे रोजी या नाटकाचा पन्नासावा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर येथे संपंन्न झाला. या निमित्ताने सन्माननीय अशोक सराफ, नाना पाटेकर, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, महेश कोठारे, उदय टिकेकर, सचिन पिळगांवकर, यांसारख्या दिग्गज मंडळींनी आवर्जून उपस्थित लावली. नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगाचे सेलिब्रेशन केक कापून करण्यात आले,धम्माल गप्पा रंगल्या, सर्व कलाकारांचे,लेखकाचे, दिग्दर्शकांचे भरभरून कौतुक झाले आणि या सर्व जेष्ठ दिग्गज कलाकारांनी नाटकांच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा दिल्या.

अभिजीत साटम, नरेन चव्हाण आणि ऋजुता चव्हाण निर्मित या नाटकात सुमीत राघवन आणि स्वानंदी टिकेकर प्रमुख भूमिकेत आहेत. सुदीप मोडक यांनी हे नाटक लिहिले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सुदीप मोडक आणि नीरज शिरवाईकर यांनी केले आहे.

‘एक शून्य तीन’ ही महिला हेल्पलाईन असली तरी प्रत्यक्ष नाटक मात्र त्या थिमवर नसून वेगळ्याच धाटणीचे आहे . हेल्पलाईन नंबरचा फक्त प्रतिकात्मक वापर करण्यात आला असून नाटकाच्या निमित्ताने हा नंबर प्रेक्षकांच्या लक्षात राहावा हा त्याचा मुख्य हेतू आहे.”, असे नाटकाचे निर्माते अभिजीत साटम सांगतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *