गौरवशाली ‘पुढचं पाऊल’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘गुड बाय एपिसोड’ शनिवारी १ जुलै रोजी… सासु-सुनेच्या नात्यावर आधारित आजवर अनेक मालिका झाल्या. मात्र, या सर्वांत लक्षवेधी ठरली ती ‘स्टार प्रवाह’ची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात अफाट लोकप्रियता लाभलेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाहची सर्वाधिक काळ चाललेली, प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही मालिका संपणार आहे. त्यामुळे अवघा महाराष्ट्र […]

प्रेमाच्या प्रवासाचा पहिला थांबा, भेटली तू पुन्हाचा टीझर प्रदर्शित!

दूर डोंगरपल्याड उंच मनोऱ्यात एखादी राजकुमारी प्राण कंठाशी आणून आपली वाट बघत असेल आणि आपण तिची सुटका करू किंवा दुरून कुठूनसा एक राजकुमार घोड्यावर बसून दुडकत, दुडकत येईल आणि आपल्याला घेऊन जाईल अशी स्वप्न आपण प्रत्येकच जण कधी ना कधीतरी बघतो. आजच्या प्रॅक्टिकल जगात ही अगदीच परीकथेतली स्वप्नं वाटली तर मग लांबवर पसरलेल्या पिवळ्या मोहरीच्या […]

लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि.च्या दोन पुस्तकांचे अभिनेते सचिन खेडकरांच्या हस्ते प्रकाशन

चाकोरीबाहेर जाऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचं नेहमी कौतुक होतंच, पण त्यासोबतच समाजासमोर त्या नवा आदर्शही निर्माण करत असतात. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि डॉ. वसुधा आपटे यांनी अशाच प्रकारची कामगिरी बजावत समाजमनावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि.च्या दैनिक प्रत्यक्षच्या माध्यमातून त्यांच्या लेखनशैलीचं दर्शनही समाजाला घडलं आहे. प्रत्यक्षमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांना […]

तमाशातला नाच्या येतोय स्टार प्रवाहवर!

‘गोठ’ मालिकेत सिद्धेश्वर झाडबुके साकारणार बाबी मामाची भूमिका तमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत नाच्याची एंट्री होणार […]

“डोण्ट वरी Be Happy” चे नाबाद २०० प्रयोग

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या “डोण्ट वरी Be Happy” या नाटकानं २०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आताच्या बहुमाध्यमांच्या काळात एखाद्या नाटकाचे २०० प्रयोग होणं ही नक्कीच गौरवाची बाब आहे. हे नाटक म्हणजे अनेक जोडप्यांसाठी कौन्सेलर ठरलं आहे. अलीकडच्या काळात पती-पत्नीच्या नात्यावर आधारित अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली. कौटुंबिक नाटकाची संकल्पना बाजूला […]

राणादा आणि पाठकबाईंचं रोमँटिक गाणं…

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमध्ये राणा आणि अंजलीच्या प्रेमाचं नवं पर्व आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मुलींशी बोलताना घाबरणारा, मुलींची भीती वाटणारा राणा आणि त्याचा घाबरा स्वभाव सर्वांनाच माहित आहे. विशेष म्हणजे अंजलीशी लग्न झाल्यानंतरही त्याचा हा स्वभाव काही बदलला नव्हता. परंतु आता मात्र राणाचं एक नवं रोमॅंटीक रुप अंजलीला आणि प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. “ओढ […]

स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’मध्ये होणार उषा नाडकर्णी यांची एंट्री

जवळपास चार दशकं आपल्या समर्थ अभिनयानं मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोटा पडदा गाजवलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची स्टार प्रवाहवरील ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेत येत्या आठवड्यात एंट्री होणार आहे. त्यांच्या प्रवेशाने मालिकेचं कथानक नव्या वळणावर येणार आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेचे तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत. अत्यंत वेगळ्या विषयावरील ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेनं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला आहे. सकस […]

‘लागिरं झालं जी’ मध्ये साजरी होणार रमजान ईद

आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी, गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत. सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्न आणि ती […]

‘मला काहीच Problem नाही!’ चा फर्स्ट लूक

गेले काही दिवस स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी सतत म्हणत आहेत की त्यांना ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’. पण कसला प्रॉब्लेम, नेमकं काय झालंय याचा अंदाज प्रेक्षकांना काय बांधता येत नाहीये. पण आता कदाचित तुम्हाला या संबंधित कल्पना येईल कारण नुकतेच या चित्रपटाच्या टीमने ‘मला काहीच Problem नाही!’ चा फर्स्ट लूक सोशल मिडीयावर प्रदर्शित केला आहे. […]

अखेर ‘बॉईज’चे पोस्टर लाँच

गेले अनेक दिवस ‘बॉईज’ या सिनेमाच्या पोस्टरमधील त्या तीन ‘बॉईज’ बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सिनेमाच्या टीजर पोस्टरवर पाठमोरी उभी असणारी ही तीन मुलं नेमकी कोण आहेत? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला. पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये नुकताच झालेल्या ‘बॉईज’च्या पोस्टर लाँच समारंभात याचा उलगडा झाला. ही तीन मुले म्हणजेच पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि […]