बहुचर्चित सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘मांजा’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

जतिन वागळे दिग्दर्शित ‘मांजा’ या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी इंडिया स्टोरीज या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर आणि रोहित फाळके स्टारर ‘मांजा’ हा चित्रपट येत्या २१ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


आपल्या सभोवताली असणाऱ्या बांडगुळ स्वभावाच्या माणसांवर भाष्य करणारा मांजा या चित्रपटाचा टिझर अतिशय थक्क करणारा आहे. सुमेध आणि रोहित ही दोन मुलं आणि त्यांच्यात असणारा टिझर मधील संवाद हा तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. Parasite, Drugs, Energy Source असं संभाषण करत एक्सप्रेस हायवे वर उभे असणारे दोन मित्र आणि त्यातील एकाने केलेल्या विक्षिप्त प्रकाराने लक्षात येतं की नक्कीच हा चित्रपट एका आगळ्यावेगळ्या प्रवृत्तीवर भाष्य करतो. आजच्या पिढीतील मुलं आयुष्यात थ्रिल अनुभवायला कुठल्या थरा पर्यंत जाऊ शकतात असा प्रश्न आपल्याला हा टिझर पाहिल्यावर पडतो.

https://www.youtube.com/embed/rxGLS5q7csw

अत्यंत उत्सुकता निर्माण करणारा असा हा चित्रपट असून चित्रपटांप्रमाणेच आपल्यालाही आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात असणारी काही विक्षिप्त माणसे गवसता येतील पण त्यासाठी मात्र वाट पहावी लागेल २१ जुलैची ! MFDC प्रस्तुत मांजा हा चित्रपट २१ जुलै रोजी जागतिक पाळतीवर प्रदर्शित होणार आहे. नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांची MFDC ही कंपनी मराठी चित्रपट निर्मिती आणि वितरण या क्षेत्रात कार्यरत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *