लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ?

लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ?

– स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत येणार अनवट वळण


नावात काय असतं, असं म्हटलं जातं. मात्र, नाव हीच खरी ओळख असते. नाव लपवून बदललेल्या ओळखीनं काय घडू शकतं हे स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत पहायला मिळतं. मात्र, आपली खरी ओळख नवऱ्याला, दुष्यंतला सांगण्याचा विचार मैथिलीनं केला आहे.वाढदिवसाच्या दिवशी सत्य सांगण्याचा तिनं घेतलेला निर्णय ती पार पाडते का, अशा अनवट वळणावर ही मालिका येऊन ठेपली आहे.

सूर्यवंशी घराणं उद्ध्वस्त करण्यासाठी बल्लाळ आणि परसूच्या सांगण्यानुसार मैथिली दुष्यंतची बायको होऊन आली. या घराचं निर्दोषत्त्व लवकरच तिच्या लक्षात आलं आणि तीही त्या घरात सहज मिसळून गेली. बहिणीला वाचवण्यासाठी मैथिलीपुढे दुसरा काही पर्यायही नव्हता. मैथिलीची बहीण नेहा त्याच घरात आली. मात्र, तिची स्मृती हरवली होती. मैथिलीच्या वागण्याचा दुष्यंतलाही संशय येत होता. इतक्यातच नेहाची स्मृती परत आली आहे. खरी ओळख सांगून या घरातून बाहेर पडण्याबद्दल नेहानं मैथिलीला समजावलं आहे. मैथिलीनंही तिची म्हणणं मान्य करून दुष्यंतला आपली खरी ओळख सांगण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी तिनं लग्नाच्या वाढदिवसाची निवड केली आहे. लग्नाच्या वाढदिवसासाठी दुष्यंतनं मैथिलीसाठी खास प्लॅनिंग केलं आहे. मात्र, मैथिलीच्या निर्णयानं आता या सेलिब्रेशनवेळी काय घडणार, याची उत्सुकता आहे.


लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदात मैथिली आपली खरी ओळख दुष्यंतला सांगणार का, हे जाणून घेण्यासाठी पहा ‘दुहेरी’ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *