‘मला काहीच Problem नाही!’ चा फर्स्ट लूक

गेले काही दिवस स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी सतत म्हणत आहेत की त्यांना ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’. पण कसला प्रॉब्लेम, नेमकं काय झालंय याचा अंदाज प्रेक्षकांना काय बांधता येत नाहीये. पण आता कदाचित तुम्हाला या संबंधित कल्पना येईल कारण नुकतेच या चित्रपटाच्या टीमने ‘मला काहीच Problem नाही!’ चा फर्स्ट लूक सोशल मिडीयावर प्रदर्शित केला आहे.


आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळे इतके बिझी झालेयत की ‘फॅमिली टाईम’ ही कन्सेप्ट दुर्लक्षित होत चालली आहे. काम काम काम आणि त्यातून बाहेर आलं की प्रत्येकाचे स्वतःच्या प्रॉब्लेम्सचे गुणगान! अशा वेळी “मला काहीच प्रॉब्लेम नाही” असं म्हणणाऱ्या कोणाची हाक ऐकू आली की सगळ्यांच्या नजरा कशा त्यांच्याकडे एकवटतात. असंच काहीसं या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची सुरुवात गश्मीर-स्पृहाच्या लग्नाच्या होकारापासून होते मात्र ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ असे बोलून सुरुवात झालेल्या फर्स्ट लूकमध्ये पुढे काय-काय घडतं ते तुम्हीच पहा

स्पृहा आणि गश्मीर यांच्यासह निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईक व सतीश आळेकर यांसारखे नामवंत कलाकार देखील या चित्रपटाचा भाग आहेच. टॉरक्यू, फिल्मी किडा प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, पी.एस छतवाल, रिचा सिन्हा आणि रवी सिंह निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘मला काहीच Problem नाही!’ २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *