‘लागिरं झालं जी’ मध्ये साजरी होणार रमजान ईद

आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी, गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत.


सातारा जिल्हा आणि भारतीय सैन्याचं असलेलं नातं, तेथील तरुणांची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड याची गोष्ट सांगणारी ‘लागिरं झालं जी’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच सुरु झाली आहे. कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. विशेषतः मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल हे कमालीचे लोकप्रिय झाले आहेत आणि राहूल, विकी, यास्मिन, हर्षल हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत.


ग्रामीण पार्श्वभूमी, तिकडे घडणाऱ्या गमती जमती, अज्या-शीतलीने खोड्या काढत एकमेकांवर कुरघोडी करणे या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याच मालिकेत आता प्रेक्षकांना ईद साजरी होताना बघायला मिळणार आहे. शीतलची मैत्रीण असलेली यास्मिनच्या घरी सर्व जण रमजान ईदनिमित्ताने एकत्र येणार असून ईद मुबारक म्हणत शिरकुर्माचा आस्वादही घेणार आहेत. सध्या सर्वत्र रमजानचा माहौल आहे. मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा सण सर्वात पवित्र असा सण असतो. रोजाच्या माध्यमातून करण्यात येणारी खुदाची इबादत आणि रमजानचा चॉंद बघण्याची उत्सुकता या काळात बघायला मिळते. असंच काहीसं वातावरण ‘लागिर झालं जी’ या मालिकेतसुद्धा बघायला मिळणार आहे. शीतलीची मैत्रीण असलेली यास्मिन आणि तिच्या कुटुंबियांसोबत सर्व जण ईद साजरी करणार आहेत. तिथे नेमकं काय घडणार आणि ईदचा आनंद हे सर्वजण कसे लुटणार हे येत्या २६ जूनच्या भागात बघायला मिळणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *