स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’मध्ये होणार उषा नाडकर्णी यांची एंट्री

जवळपास चार दशकं आपल्या समर्थ अभिनयानं मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोटा पडदा गाजवलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची स्टार प्रवाहवरील ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेत येत्या आठवड्यात एंट्री होणार आहे. त्यांच्या प्रवेशाने मालिकेचं कथानक नव्या वळणावर येणार आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेचे तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत.


अत्यंत वेगळ्या विषयावरील ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेनं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला आहे. सकस कथानक, उत्तम अभिनेते ही या मालिकेची वैशिष्ट्य आहेत. ग्रामीण महाराष्ट्र ते बग्गीवाला चाळीच्या रुपानं मराठी टेलिव्हिजनवर बऱ्याच काळानंतर एक वेगळा, विषय आशय या मालिकेन हाताळला. त्यातल्या व्यक्तिरेखाही लोकप्रिय झाल्या. नकुशी आणि रणजित यांचं नातं आता फुलतं आहे, त्यांच्याकडे गोड बातमीही आहे. या पार्श्वभूमीवर, उषा नाडकर्णी यांचा प्रवेश होणं हा मालिकेतला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


उषा नाडकर्णी यांच्यासारखी सक्षम अभिनेत्री नकुशीमध्ये येत असल्यानं स्टार प्रवाहवर संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेचं महत्त्व अजून वाढणार आहे. आता त्यांची व्यक्तिरेखा काय आहे, त्यांच्या येण्यानं कथानक काय वळणं घेतं याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *