राणादा आणि पाठकबाईंचं रोमँटिक गाणं…

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमध्ये राणा आणि अंजलीच्या प्रेमाचं नवं पर्व आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

मुलींशी बोलताना घाबरणारा, मुलींची भीती वाटणारा राणा आणि त्याचा घाबरा स्वभाव सर्वांनाच माहित आहे. विशेष म्हणजे अंजलीशी लग्न झाल्यानंतरही त्याचा हा स्वभाव काही बदलला नव्हता. परंतु आता मात्र राणाचं एक नवं रोमॅंटीक रुप अंजलीला आणि प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

“ओढ ही लागली, साजणी लाजली… चांदणी चांदव्यावर भाळली…”
मित्रांनो राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नाच्या प्रेमाचं हे सुंदर गाणं खास तुमच्यासाठी…

राणा आता बिनधास्त झालाय आणि तो आपलं प्रेम , आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करु लागलाय. त्याच्या राहण्या-वागण्याच्या पद्धतीतही बदल झालाय. त्याच्यातील या बदलाने अंजलीही भारावून गेलीये आणि तिलाही राणाची ओढ लागलीये. त्यांच्यातील नात्याच्या याच भावना रेखाटणारं एक नवं गाणंही चित्रीत करण्यात आलं आहे.

जे येत्या मंगळवारच्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हे गाणं सुखदा भावे यांनी शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलं असून जितेंद्र तुपेने ते गायलं आहे. राणा-अंजलीच्या प्रेमाचं हे नवं पर्व बघायला विसरु नका तुझ्यात जीव रंगला मालिकेत सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. फक्त झी मराठीवर.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *