प्रेमाच्या प्रवासाचा पहिला थांबा, भेटली तू पुन्हाचा टीझर प्रदर्शित!

दूर डोंगरपल्याड उंच मनोऱ्यात एखादी राजकुमारी प्राण कंठाशी आणून आपली वाट बघत असेल आणि आपण तिची सुटका करू किंवा दुरून कुठूनसा एक राजकुमार घोड्यावर बसून दुडकत, दुडकत येईल आणि आपल्याला घेऊन जाईल अशी स्वप्न आपण प्रत्येकच जण कधी ना कधीतरी बघतो. आजच्या प्रॅक्टिकल जगात ही अगदीच परीकथेतली स्वप्नं वाटली तर मग लांबवर पसरलेल्या पिवळ्या मोहरीच्या फुलांमध्ये एकमेकांमध्ये पूर्णपणे बुडून गेलेले ते दोघं, हे ‘बॉलीवूड’ स्वप्न तर हमखास प्रत्येक जण बघतो. आपल्या जोडीदाराबद्दल प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असतात आणि आपल्या स्वप्नातल्या त्या व्यक्तीच्या आपण पहिल्या भेटीत प्रेमात पडणार ही खात्री सुद्धा असते.

‘भेटली तू पुन्हाचा’ नायक, आलोकची पण आपल्या जोडीदाराबद्दल अशीच काही स्वप्नं आहेत. पण आयुष्याचा प्रवास असा ठरलेला थोडीच असतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझर मधून आलोकच्या आयुष्यात आलेले अनपेक्षित वळण आपल्याला बघायला मिळत आहे.


दुसऱ्या नजरेत घडणाऱ्या प्रेमकथेबद्दल सांगणाऱ्या चंद्रकांत कणसे दिग्दर्शित, स्वरूप रिक्रिएशन अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि सचिन नारकर, विकास पवार निर्मित ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटातून वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *