डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘अर्धसत्य’चा फर्स्ट लूक

हल्ली आपण पाहतोय की मराठी रंगभूमीवर विविध विषय हाताळले जात आहेत आणि नाटकांची संख्यादेखील वाढत आहे. आपल्या कणखर अभिनयाने मराठी रंगभूमी पण गाजवणारे डॉ. अमोल कोल्हे आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर एका नव्या नाटकाच्या माध्यमातून अवतरणार आहेत.


शार्गी प्रॉडक्शन निर्मित ‘अर्धसत्य’ हे नवंकोरं नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. प्रसाद दाणी लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘अर्धसत्य’ या नाटकाची निर्मिती मुकेश शिपुरकर यांनी केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि त्यांच्यासह प्रसाद दाणी, दीपक करंजीकर, गौरीश शिपुरकर आणि सरिता मेहेंदळे यांच्या देखील भूमिका आहेत.

डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘अर्धसत्य’ नाटकाचा फर्स्ट लूक त्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरुन प्रदर्शित केला आहे. नक्की या नाटकाचा विषय काय आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *