“सोनूsss”…तुझा ‘एक’च प्याला? वर भरोशा नाय का…

“सोनूsss”… असं कोणी म्हटलं तर आपसूकच “तुझा मायावर भरोसा नाय काय?” हे शब्द ओठावर येतात.कारण सध्या याच गाण्याची क्रेझ तरुणांमध्ये आहे. विविध भाषांमध्ये या गाण्याचे व्हर्जन आलेत मग आपले मराठी कलाकार तरी कसे पाठी राहतील.


सध्या रंगभूमीवर गाजणार नाटक म्हणजे आचार्य अत्रे, लिखित विडंबन ‘एक’च प्याला? . या नाटकातील कलाकारांनी सुद्धा या गाण्याचा आधार आपल्या नाटकांच्या प्रसिद्धीसाठी केला आणि तो सफल ठरला. एकच प्याला या नाटकाचा नायक ‘सुधाकर’ म्हणजेच ‘सुशांत शेलार’ यांच्या संकल्पनेतून ‘एक’च प्याला? टीमने साकारला “सोनूsss…” चा व्हिडीओ आणि तो सोशल मीडिया वर वायरल झाला. एका दिवसातच या व्हिडीओला ८५,००० विव्ह्स मिळाले. तुम्ही हा व्हिडीओ पहिला नसाल तर नक्की पहा.

असा प्रयोग पहिल्यांदाच मराठी नाटकांसाठी केला गेला आणि रसिकांनीही चांगली साथ दिली. सध्या मराठी रंगभूमीवर नवीन आणि सामाजिक विषय नाटकांद्वारे हाताळले जात आहेत आणि ते विषय तरुणांपर्यंत पोहोचणेही गरजेचे आहे. म्हणूनच नव्या पिढीला नाटकांकडे वळवण्यासाठी ‘सुशांत शेलार’ यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. सध्या “सोनूsss”… हे गाणं सोशल मीडिया वर खूपच लोकप्रिय आहे आणि या गाण्याची नवीन नवीन व्हर्जन सोशल मीडिया लगेच वायरल होतात आणि म्हणूनच ‘सुशांत शेलार’ यांच्या संकल्पनेतून ‘एक’च प्याला? टीमने साकारला “सोनूsss” चा व्हिडीओसुद्धा वायरल झाला.


आचार्य अत्रे, लिखित, अशोक मोरे, निर्मित आणि सतीश उद्धव पुळेकर, दिग्दर्शित विडंबन ‘एक’च प्याला? या नाटकात पल्लवी वैद्य, अमोल बावडेकर, स्वप्नील राजशेखर, विनायक भावे, हेमंत भालेकर, मृणालिनी जावळे, सायली सांभारे, मकरंद पाध्ये, धैर्य गोवळकर, पुरुषोत्तम, मंगेश आणि सुशांत शेलार हे कलाकार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *