शेंटिमेंटलचा ट्रेलर प्रदर्शित!

नोकरी मग ती खाजगी असो, सरकारी असो, निमसरकारी असो प्रत्येक ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखणं, ‘वर्क लोड’ पायी घरच्यांकडे दुर्लक्ष करणं, ‘डेड लाईनचा’ स्ट्रेस हे सगळं आलंच ! पण जे काम करतोय त्यात पॅशन, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची वृत्ती असेल तर मग येणारा प्रत्येक दिवस ‘शेंटिमेंटल’ वाटायला लागतो. असे पॅशनेट, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे शेंटिमेंटल पोलीस अनुभवायचे असतील तर मग नुकताच प्रदर्शित झालेला ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाचा ट्रेलर चुकवून चालणार नाही.


अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके यांच्या ई. सी. एम. पिक्चर्स द्वारे निर्मित, आर. आर. पी. कॉर्पोरेशन, बनी डालमिया प्रस्तुत आणि समीर पाटील लिखित दिग्दर्शित ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटामध्ये पोलिसांमधील ‘शेंटिमेंटल’ माणसाचे चित्रण खुमासदार पद्धतीने करण्यात आले आहे.

अशोक सराफ, उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुबीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *