दुहेरी टीमचा अतरंगी व्हिडिओ झाला व्हायरल

टेलिव्हिजन मालिकेच्या टीम मेंबर्समध्ये फक्त प्रोफेशनल नातं असतं असं नाही. तर ही टीम म्हणजे एक कुटुंबच असतं. कुटुंबात जशी धमाल मस्ती केली जाते, तशीच मालिकेच्या सेटवरही केली जाते. स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेच्या सेटवरचा ‘हेअरकट’ हा अतरंगी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘चिप थ्रील्स’ या मूळ इंग्रजी गाण्यावरच्या या व्हिडिओला ५३ हजारहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असून, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होत आहे.


‘दुहेरी’ मालिकेतील सुपर्णा श्याम, संकेत पाठक, सिद्धेश प्रभाकर आणि सुनील तावडे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सुपर्णा श्यामने नुकताच नवा हेअरकट केला. त्यानिमित्ताने सेलिब्रेशन म्हणून हा धमाल आणि अतरंगी व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. मूळ इंग्रजी गाण्यावर हे तिघं आपल्या केसांच्या सहाय्याने नाचले आहेत. तर, सुनील तावडे त्यांच्या खास शैलीत त्यात सहभागी झाले आहेत. सुनील तावडे यांचा या व्हिडिओतील लूक देखील भन्नाट आहे. एक मिनिटाचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही पोट धरून हसणार आहात यात काही शंकाच नाही.


सुपर्णाच्या इन्स्टाग्रामवर या अतरंगी व्हिडिओला ३५ हजारहून अधिक लाईक्स, स्टार प्रवाहच्या फेसबुकवर १८ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याशिवाय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर होत आहे. ‘दुहेरी’ टीमच्या या पडद्यामागच्या धमाल मस्तीला आणि अतरंगीपणाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *