‘बॉईज’चा डबल धमाल पहिला टीझर प्रदर्शित

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा ‘बॉईज’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर या सिनेमाचा टिझर लाँच करण्यात आला. या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक यांच्या सहाय्याने प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते यांनी आपल्या फेसबुक आणि युट्युबवर ‘बॉईज’ चा टिझर लाँच केला.


https://www.youtube.com/embed/2_ryg_Ru6zM

पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता, प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची विचार करण्याची अनोखी पद्धत असे बरेच काही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तीन मित्रांचा पाठमोरा लुक असणारा या सिनेमाचा टिझर सोशल नेट्वर्किंग साईटवर चर्चेचा विषय ठरत असतानाच बॉईजगिरी करणारे ढुंग्या आणि धैर्य त्यांना मिळालेल्या शिक्षेचा आनंद लुटत असल्याचा नवीन टीझर प्रदर्शित झाला. ‘बॉईज’मध्ये ही बॉईजगिरी बघून आपल्याला पण आपले बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री होतेय.

https://www.youtube.com/embed/Iz7UoZemJZg

‘सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली; लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी निर्मिती केली असून, विशाल देवरुखकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसेच अवधूत गुप्ते प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. ह्या सिनेमाच्या मोशन पोस्टरमुळे सिनेमा युथ इंटरटेनिंग असल्याचे जाणवते. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवा पिढीची दुनिया यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, येत्या युथ फेस्टीवल सीझनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमातील पोस्टरवरील ते तीन ‘बॉईज’ कशी बॉईजगिरी करणार हे जाणून घ्यायचे असेल, तर आणखीन काही दिवस वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *