‘बॉईज’ चित्रपट — ८ सप्टेंबरपासून प्रदर्शित

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा ‘बॉईज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालेला आहे. येत्या यूथ फेस्टिवल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असे सुरुवातीपासून सांगण्यात आले होते आणि नुकतीच या चित्रपटाच्या टीमने प्रदर्शित तारीख एका नव्या कोऱ्या पोस्टरच्या माध्यमातून जाहिर केली आहे.


पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता, प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची विचार करण्याची अनोखी पद्धत असे बरेच काही दाखवणारा ‘बॉईज’ चित्रपट ८ सप्टेंबर २०१७ ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तसेच यामध्ये रितिका श्रोत्री, संतोष जुवेकर, जाकीर हुसेन, शिल्पा तुळसकर, शर्वरी जमेनीस आणि वैभव मांगले या कलाकारांच्या भूमिका आहेत.


‘सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली; लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी निर्मिती केली असून, विशाल देवरुखकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसेच अवधूत गुप्ते प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *