सचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बापजन्म’चा टिझर प्रदर्शित

प्रत्येकजण निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची झलक पाहण्याची प्रतिक्षा करत असताना नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. जितकी प्रतिक्षा या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी केली त्याहून जास्त गूढ या चित्रपटामध्ये लपलेले आहे असे जाणवते.


मनोरंजनसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते सचिन खेडेकर यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बापजन्म’ हा त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. कारण ते नेहमीच वेगळ्या भूमिका प्रेक्षकांसमोर सादर करत असतात. या टिझरमध्ये तुम्हांला त्यांची वेगळी शेड पाहायला मिळेल. त्यांचं म्हणजेच त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं दैनंदिन जीवन, त्यांचा लूक आणि त्यांची उत्कृष्ट डायलॉग डिलिव्हरी करण्याची शैली या संपूर्ण गोष्टीने परिपूर्ण टिझर ही खरंच वेगळी मनोरंजनाची मेजवाणी आहे.

सचिन खेडेकर यांच्यासह अभिनेता पुष्कराज चिरपुटकर याची पण या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

https://www.youtube.com/embed/y9iFphq6ojA

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी केली आहे. तसेच ‘बापजन्म’ हा चित्रपट प्रेक्षकांना १५ सप्टेंबर २०१७ ला अनुभवयाला मिळणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *