‘जो है सब Alright है’ असे हंपी चे पोस्टर प्रदर्शित

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी आणि प्रियदर्शन जाधव यांच्या आगामी चित्रपट ‘हंपी’चे टिझर पोस्टर रिलीज झाले.


कर्नाटकमधील ‘हंपी’ येथे या सिनेमाचे शूटिंग झाले. नवनवीन शूटिंग लोकेशन्स आणि त्या अनुषंगाने कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे. त्यामुळे आता अशा वेगवेगळ्या लोकेशनवर आपल्याला मराठी चित्रपट देखील बघायला मिळणार आहे. ‘स्वरूप समर्थ एंटरटेनमेंट’च्या योगेश भालेराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रकाश कुंटे हे आता मराठी चित्रपटाला ‘हंपी’च्या वाटेवर घेऊन जाणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी व अभिनेता ललित प्रभाकर यांनी फेसबुक लाईव्ह करत चाहत्यांना ‘चला हंपीला जाऊया’ असे आवाहन केले.
“तुमच्या भेटीला येत आहोत काही तरी नवीन घेऊन! आपली एक नवीन स्टोरी बनवूया, एकत्र प्रवास करूया! चला हंपीला जाऊया!”

https://www.facebook.com/sonalee1/videos/745741852284116/&width=500&show_text=false&height=889&appId

https://www.facebook.com/834407153347657/videos/1430839077037792/&width=500&show_text=false&height=885&appId

‘हंपी’ च्या ह्या पोस्टरमध्ये गावातल्या रस्त्यावरुन एक रिक्षा जाताना दिसत आहे. रिक्षावर लावलेला बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. रिक्षावर मोठ्या अक्षरात ‘ग्लोबल दिल’ असे लिहिले आहे. सिनेमाचा विषय काय असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे. सिनेमाच्या ऑफिशिअल साईटवर ‘हंपी’चा आणखी एक लोगो पोस्टर झळकत आहे. या पोस्टरवर फक्त ‘हंपी’ असे लिहले असून त्यावर ‘जो है सब alright है’ अशी टॅगलाईन दिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *