‘ग्लोबल दिल’ संगे घडणार ‘हंपी’ची सफर

कर्नाटकातलं हंपी हे आपल्याला तेथील वास्तू, लेणी आणि मंदीरे यासाठी माहीत आहे. मात्र, प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं नावंच ‘हंपी’ आहे. स्वरूप समर्थ एंटरटेन्मेन्टच्या योगेश भालेराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिवाळीनंतर ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा पहिला टीजर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे.

या टीजरमध्ये अभिनेता प्रियदर्शन जाधव कन्नड रिक्षावाल्याच्या भूमिकेत दिसत असून, तो वेलकम टू “हंपी” असं म्हणतो. अत्यंत मजेशीर अशा या टीजरनं चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अभिनेता ललित प्रभाकर अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एका मुलीचा भावनिक प्रवास या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अदिती मोघेचे असून सिनेमॅटोग्राफर म्हणून अमलेंदु चौधरी यांनी काम पाहिले आहे.

प्रकाश कुंटे यांनी यापूर्वी ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘अँड जरा हटके’ असे उत्तम चित्रपट केले आहेत. त्यामुळे “हंपी” या चित्रपटातून प्रकाश पुन्हा नवं काहीतरी घेऊन येणार हे नक्की!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *