सुनिधी चौहान व शाल्मली खोलगडे पहिल्यांदा एकत्र

आपल्या पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आगामी ‘बबन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाच्या ‘साज ह्यो तुझा’ या पहिल्या गीताने सोशल मिडीयावर रसिकांची पसंती मिळविली आहे. त्याला चार लाखाहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत. आता ‘बबन’ सिनेमातील दुसरे गाणे ‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ चाहत्यांच्या भेटीला आले […]

शिक्षणाचा वेध घेणारा ‘बारायण’

अतिशय हटके नाव असलेल्या ‘बारायण’ या आगामी चित्रपटाचे खूपच कल्पक पोस्टर १२ नोव्हेंबराला सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या बोलक्या पोस्टर वरून हा चित्रपट शैक्षणिक विषयावर भाष्य करणारा दिसतोय, पण हा चित्रपट नुसता भाष्य करणारा नसून पोस्टरमधला ‘विशालकोन’, शिक्षणाचा एक वेगळा ‘अँगल’ सुद्धा दाखवतोय. हा विशालकोन, पेन्सिल आणि कोनमापक यांचं बनलेलं धनुष्य कुठला वेध घेतयं, […]

५५० ऑडिशन्समधून सापडली विठूमाऊली

स्टार प्रवाहची पौराणिक नवी मालिका ‘विठूमाऊली’नं अल्पावधीतच महाराष्ट्रावर गारूड केलं आहे. मात्र, या मालिकेतल्या विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणं हे मोठं आव्हान होतं. तब्बल ५५० कलाकारांची ऑडिशन झाल्यानंतर विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी अजिंक्य राऊत या नव्या अभिनेत्याची निवड झाली. विठूमाऊली या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून स्टार प्रवाहवर 30 ऑक्टोबरपासून नवं पर्व सुरू झालं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या […]

‘पावनी’च्या भूमिकेत मीरा जोशीची ‘कुलस्वामिनी’मध्ये एंट्री

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतील आरोही आणि राजस यांचं नातं त्यांच्या विरोधात होणाऱ्या कारस्थानांना तोंड देत तावून सुलाखून निघत आहे. आता पुन्हा या नात्यात दुरावा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अभयची गर्लफ्रेंड असलेली पावनी या मालिकेत एंट्री घेत आहे. अभिनेत्री मीरा जोशी ‘पावनी’ची भूमिका साकारत आहे. या नव्या एंट्रीनं कुलस्वामिनी या मालिकेत नवं […]

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित, ‘बबन’ २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ नंतर नवीन कलाकृती… ‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हे आता ‘बबन’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. बबन या चित्रपटातून एका महत्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा ते रंगविणार आहेत. या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले आहे. […]

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित, ‘बबन’ २३ मार्च रोजी प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ नंतर नवीन कलाकृती… ‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हे आता ‘बबन’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. बबन या चित्रपटातून एका महत्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा ते रंगविणार आहेत. या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले आहे. […]

स्वप्नील जोशीची पहिली सिरीयल निर्मिती ‘नकळत सारे घडले’

अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडले’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो. या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत […]