‘सत्यमेव जयते’ मध्ये अमृता खानविलकरची भूमिका


आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या अमृता खानविलकरला २०१८ हे वर्ष खूपच यशदायी ठरत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ या चित्रपटातील तिच्या उर्दू लहेजाचे सर्वत्र कौतुक झाले होते. समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचला आहे. तसेच तिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅमेज्ड’ या वेब सिरीजने नुकताच १० मिलीअन व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे, त्यामुळे सध्या ही गुणी अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
‘राझी’ मधील शांत आणि सुस्वभावी अशी ‘मुनिरा’ आणि ‘डॅमेज्ड’ या वेब सिरीजमधील अंगावर शहारा आणणारी सीरिअल किलर ‘लोव्हीना’ साकारल्यानंतर अमृता आता मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात ती ‘सरिता’ हे मनोज वाजपेयी यांच्या पत्नीचे पात्र साकारत आहे.
Originally published at Marathi PR.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *