मराठी मालिकाही हिंदीच्या तोडीस तोड

‘नकुशी’चे सिनेमॅटोग्राफर बाळू दहिफळे यांचं मत ‘मराठी मालिकांमध्ये खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत. सध्या मराठी मालिका हिंदीच्या तोडीस तोड काम करत आहेत,’ असं मत हिंदी टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर असलेल्या बाळू दहिफळे यांनी व्यक्त केले आहे. बाळू दहिफळे यांनी स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ या मालिकेचं छायांकन करून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. पैठणचे सुपुत्र असलेल्या […]

अशी सापडली शेरनाझ!

स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’मध्ये शिविका तनेजा स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेत शेरनाझच्या एंट्रीनं कथानकाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र, शेरनाझच्या भूमिकेसाठीची निवड प्रक्रिया फारच गमतीशीर होती. बराच काळ शोध घेतल्यानंतर शेरनाझच्या भूमिकेसाठी शिविका तनेजाची निवड झाली. ग्लॅमरस असलेली शिविका ही भूमिका साकारते आहे. मालिकेचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि टीम शेरनाझच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. जवळपास २०पेक्षा जास्त […]

स्टार प्रवाहवर दर शनिवारी ‘तुफान आलंया’चं प्रसारण

सुपरस्टारपदावर विराजमान असूनही सामाजिक प्रश्नांचं भान असलेला अभिनेता आमीर खाननं महाराष्ट्रातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. सहजसोप्या पद्धतीनं दुष्काळमुक्ती करण्यासाठी ‘वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेच्या रुपानं चळवळ सुरू झाली. गेल्या वर्षी ३ तालुके आणि ११६ गावांमध्ये रंगलेली वॉटर कप स्पर्धा यंदा ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये रंगणार आहे. दुष्काळाशी लढणाऱ्या या गावांचे प्रयत्न दाखवणारा ‘तुफान आलंया’ हा […]

अमेय आणि आकाश आमने-सामने

गेल्याच वर्षी ‘सैराट’ या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालेला आकाश ठोसर महेश मांजरेकर यांच्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहेच. या सिनेमाचं शूट तसं पूर्ण झालेलं आहे. या सिनेमाबद्दल सलमान खानने ट्विट देखील केलेले आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘ध्यानीमनी’ चित्रपटाला बॉलिवूडमधील कलाकार अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता […]

आलोक आणि इंदूची फिल्म डेट

आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचारता सोय नाही. मग ‘मुरांबा’चे आलोक आणि इंदू म्हणजेच अमेय वाघ आणि मिथिला पालकर तरी कसे मागे राहतील. नुकताच त्यांनी ‘सचिन सर पहिला मान तुमचाच’ म्हणत ‘सचिन, द बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या पोस्टरसोबत […]

आकाशचा ‘FU — दोस्तीसाठी कायपन’ मधील कूल लूक

महेश मांजरेकरांचा बहुचर्चित आगामी ‘F.U.’ या चित्रपटाचे टीजर पोस्टर बॉलिवुड सुपरस्टार आणि महेश मांजरेकरांचा खास मित्र सलमान खान याने ट्वीट केले होते आणि त्यासोबत असे पण लिहिले होते की, आकाश ठोसरला भेटा १४ एप्रिलला. अखेर, आकाश ठोसरचा ‘एफ यु’ चित्रपटातील लूक पाहायला मिळालाच. आकाश ठोसरचा लूक एकदम स्टायलिश आहे आणि त्याच्या हातामध्ये फॅशनेबल लेदरचे ब्रेसलेट […]

ललित आणि नेहा यांच्या TTMM चे टीझर पोस्टर रिलीज

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यामध्ये चाललेल्या कोल्ड वॉरचं कोडं त्यांच्या सर्व चाहत्यांना पडलेलं पण त्याचा शेवट त्यांच्या आगामी चित्रपट TTMM (तुझं तू माझं मी) च्या टिझर पोस्टर रिलीजने झाला. ललित आणि नेहा यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एंटरटेनमेंट […]