सस्पेन्स, थ्रिलर ‘मस्का’ १ जूनपासून प्रदर्शित

धम्माल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित आगामी ‘मस्का’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला. अभिनेता, नाट्य दिग्दर्शक अशी ओळख असलेला प्रियदर्शन जाधव ‘मस्का’ मधून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण […]

बहुचर्चित ‘झिपऱ्या’चा टीझर प्रदर्शित

ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध ‘झिपऱ्या’ कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले आहे. मुंबईतील रेल्वे स्टेशन जवळ आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी मुले बघितली असतील. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ही […]

‘मंकी बात’च्या ‘हाहाकार…’ ला पसंती

निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार…’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ‘हाहाकार…’ या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते. ‘मंकी बात’ च्या निमित्ताने मराठीमध्ये बऱ्याच कालावधी नंतर एक बालचित्रपट येत आहे. ही गोष्ट हसणारी.. रूसणारी …! ही गोष्ट […]

प्रेमाची ‘रॉमकॉम’ गोष्ट लवकरच येणार पडद्यावर

चित्रपटसृष्टीत प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. आजवर याच संकल्पनेवरचे कितीही चित्रपट आले असले तरी प्रत्येक चित्रपटातून प्रेमाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. आता ‘रॉमकॉम’ हा चित्रपटही प्रेमाचा वेगळ्या पद्धतीनं शोध घेणार आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त करण्यात आला. लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आणि किशोर कदम यांच्या हस्ते हा मुहूर्त संपन्न झाला. ‘ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट’ […]

११ मे रोजी सगळे म्हणणार ‘लग्न मुबारक’

‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात नां? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची ते का? या प्रश्नाचं उत्तर येत्या ११ मे २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अभय पाठक प्रॉडक्शन्स सह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटातून मिळणार आहे. […]

टायगर श्रॉफ आला गावठी सिनेमाच्या ट्रेलर लाँचला

दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ…..असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ ३० मार्च रोजी येणाऱ्या स्वत:च्या बाघी-२ या […]

‘गुलाबजाम’ येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

“अन्न हे पूर्णब्रम्ह” हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्य पदार्थांचे माहेरघरच; आणि जेवणाची पंगत म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रुचकर पदार्थांनी सजलेलं ताट. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्वाचा मार्ग आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘ये रे ये रे पैसा’ सारखा सुपरहिट चित्रपट देऊन […]

‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम

चित्रपटातील भूमिका वस्तुदर्श आणि स्वाभाविक वाटावी म्हणून आज कलाकार कितीही मेहनत करायला व त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक अलिकडील अनुभव म्हणजे मुक्ता बर्वे ने ‘आम्ही दोघी’साठी केलेली तयारी म्हणजे या चित्रपटासाठी ती चक्क विणकाम शिकली आहे. चित्रपटाची कथा दोन स्त्रीयांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर बेतली आहे. यातील अमला नावाच्या मुक्ताच्या व्यक्तिरेखेसाठी […]

“आपला मानूस” ची टीम पुणेकरांच्या भेटीला

Viacom18 मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की ! हा चित्रपट एका नाटकाच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्यालाजोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या […]

बहुचर्चित, रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर लाँच

‘जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी ‘राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज लाँच करण्यात आला आहे. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या […]