‘फॅन्ड्री’ आणि ‘हाफ तिकीट’ नंतर ‘राक्षस’ येतोय


नावात काय आहे? ‘ असं सर्रास म्हटले जाते. पण नावात बरंच काही असतं, विशेषतः आशयघन चित्रपटांच्या नावात ! ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा बरोबर दिग्दर्शक समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन जोडी प्रेक्षकांना ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राक्षस नाव ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात भीती दाटून येते. राक्षसाच एकच भयावय रूप आजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलं आहे. नुकतंच ह्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे व प्रेक्षकांनी त्याला खूप चांगली पसंती दिली आहे.


आदिवासी पाड्यावर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं ‘राक्षस’चं लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत. समित कक्कड यांनी आतापर्यंत एकाहून एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून समित कक्कड यांचा ‘आयना का बायना’ हा पहिला चित्रपट असून तो सोनी मॅक्ससाठी हिंदीत डब होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. शिवाय ‘हाफ तिकीट’ हा समित कक्कड यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट असून १५ निरनिराळ्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स’ मध्ये या चित्रपटाची निवड झाली होती आणि आता ‘राक्षस’चे ते प्रस्तुतकर्ते आहेत.

राक्षस चित्रपटात ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयानं वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे.


निर्माता-दिग्दर्शक समित कक्कड म्हणाले, मागील काही दिवसांपासून विवेक कजारीया आणि मी एका चांगल्या प्रोजेक्टसाठी एकत्र येण्याचा विचार करत होतो. ‘राक्षस’ हा चित्रपट आम्हाला एका नव्या पर्वाच्या आरंभासाठी अतिशय योग्य वाटला. या ‘राक्षस’वर प्रेक्षकही भरभरून प्रेम करतील अशी अपेक्षा आहे.

निर्माते विवेक कजारिया म्हणाले, ‘राक्षस’ हा चित्रपट आमही मनापासून बनविला आहे. दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग यांनी कथेवर प्रचंड मेहनत घेतली आहे. शरद केळकर आणि सई ताम्हणकर यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. ऍन्ड्रू यांनी आदिवासी जमातीचे संगीत अतिशय तरल पद्धतीने या सिनेमात जिवंत केले आहे. मराठी चित्रपटात एक वेगळा प्रयोग ‘राक्षस’च्या निमित्ताने घडवून आणता आला याचा मला आणि निलेश नवलखा यांना आभिमान वाटतो.

दरम्यान या चित्रपटाच्या प्रभावी पोस्टर मुळे चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली असून, २३ फेब्रुवारीला ‘राक्षस’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


Originally published at Marathi PR.

‘बारायण’ मध्ये दिग्गज कलाकारांची फौज

विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक संदेश न देता पालकांसह संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर ‘बारायण’ च्या अँथम सॉंग मधून प्रेक्षकांना मिळाले आहे. पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या ‘बारायण’ या चित्रपटात अतिशय बोलका चेहरा आणि निरागस भाव असलेला अनुराग वरळीकर हा हरहुन्नरी अभिनेता मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’च्या ‘बारायण’ या मराठी चित्रपटात अनुराग वरळीकर याच्यासह बाबांच्या भूमिकेत अभिनेते नंदू माधव, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भुतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटके पध्दतीने मनोरंजन करणाऱ्या ‘बारायण’ ची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा — संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केले आहे. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना; संगीतकार पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे.

‘बारायण’ चे अँथम सॉंग :

बारायण हा १२ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित होणार आहे.

सुनिधी चौहान व शाल्मली खोलगडे पहिल्यांदा एकत्र

आपल्या पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आगामी ‘बबन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाच्या ‘साज ह्यो तुझा’ या पहिल्या गीताने सोशल मिडीयावर रसिकांची पसंती मिळविली आहे. त्याला चार लाखाहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत.


आता ‘बबन’ सिनेमातील दुसरे गाणे ‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जादुई आवाजाने बॉलीवूडला वेड लावणाऱ्या दोन गायिका पहिल्यांदाच एकत्र गाणार आहेत. सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी याचे पार्श्वगायन केले असून संगीत ओंकारस्वरूप यांचे आहे. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी गीत लेखन केले आहे. रेकॉर्डिंगला लाईव्ह संगीत असलेल्या या गीताचे शूटिंग प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या ओरीजनल तमाशाच्या तंबूत झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=TVzMjnJj5LY

या गाण्यासाठी ऱ्हीदमीस्ट म्हणून संगीतकार प्रीतम यांच्या सोबत काम केलेले दिपेश वर्मा आणि उस्ताद झाकीर हूसेन यांचे भाचे शिखरनाद कुरेशी यांनी काम पाहिले तसेच प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत काम केलेल्या काहीजणांचा समावेश वादक टीम मध्ये आहे. या गाण्याचे खास आकर्षण म्हणजे ‘सौदागर’, ‘खलनायक’ अशा हिंदी सिनेमातील गाण्यामध्ये आपल्या “नादरूपमं” चे विविधांगी कौशल्य दाखविणाऱ्या गजानन साळूके यांचे नादरूपमं आणि सुंदरी वादन.

‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ या गीता मध्ये दाक्षिणात्य, लावणी आणि बेले असे तिहेरी संगम असलेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर आणि गणेश पतंगे यांनी केले आहे व वेशभूषा अस्मिता राठोड व अंजली भालेराव यांची आहे. या गाण्यांचे रेकॉर्डिंग यशराज स्टूडीओ मध्ये झाले असून गाण्याचे मास्टरिंग लंडन येथील स्टूडीओ मध्ये करण्यात आले असल्याने रसिकांना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.

चित्रक्षा फिल्म्स प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, प्रांजली कंझारकर, मृणाल कुलकर्णी, कृतिका तुळसकर, सीमा समर्थ या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

शिक्षणाचा वेध घेणारा ‘बारायण’

अतिशय हटके नाव असलेल्या ‘बारायण’ या आगामी चित्रपटाचे खूपच कल्पक पोस्टर १२ नोव्हेंबराला सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या बोलक्या पोस्टर वरून हा चित्रपट शैक्षणिक विषयावर भाष्य करणारा दिसतोय, पण हा चित्रपट नुसता भाष्य करणारा नसून पोस्टरमधला ‘विशालकोन’, शिक्षणाचा एक वेगळा ‘अँगल’ सुद्धा दाखवतोय. हा विशालकोन, पेन्सिल आणि कोनमापक यांचं बनलेलं धनुष्य कुठला वेध घेतयं, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पोस्टरमधील आलेख पेपरवर, वेध घेणाऱ्या धनुष्याबरोबर असणारे, ओरिगामीचे कागद आणि रंगीत पक्षी, किचकट वाटणाऱ्या शिक्षणात कलात्मकता आणू पाहतायेत का? शिवाय कोणत्याही शब्दकोशात न सापडणारा ‘बारायण’ हा शब्द शिक्षणातल्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याचा — बारावीचा वेध तर घेत नसेल ना? किंबहुना बारावीचा टप्पा खरंच इतका महत्त्वाचा आहे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अफाट उत्सुकता निर्माण झाली आहे, अगदी रिझल्टच्या आधी होते ना तशी! तसंच या चित्रपटात कलाकार कोण कोण असणार आहेत ही उत्सुकता देखील कमालीची ताणली गेलीये.


दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’चा हा चित्रपट नावाप्रमाणेच हटके असणार. पोस्टरमध्ये अतिशय कल्पकतेने मांडलेला चित्रपटाचा आशय, एका उत्तम कलाकृतीची ग्वाही देत आहे. एकंदरीतच मराठी सिनेसृष्टीला उत्तमोत्तम आशयघन चित्रपटांचा नजराणा लाभलेला आहे. नुकताच मराठी चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि गोव्यात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ मध्ये ‘इंडियन पॅनोरमा’ त, उल्लेखनीय संख्येने निवड झालेले मराठी चित्रपट, मराठी सिनेसृष्टीची उच्च अभिरुची अधोरेखित करतात. याच सिनेसृष्टीतील ‘बारायण’ हा एक उल्लेखनीय चित्रपट ठरेल.

पोस्टरमधील ‘बारा’ ला ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देणारा ‘बारायण’ येत्या १२ जानेवारीला म्हणजे, तरुणांसाठीआदर्श असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला, राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल आणि सर्वच वेधक प्रश्नांची अचूक उत्तरं प्रेक्षकांना मिळतील !

५५० ऑडिशन्समधून सापडली विठूमाऊली

स्टार प्रवाहची पौराणिक नवी मालिका ‘विठूमाऊली’नं अल्पावधीतच महाराष्ट्रावर गारूड केलं आहे. मात्र, या मालिकेतल्या विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणं हे मोठं आव्हान होतं. तब्बल ५५० कलाकारांची ऑडिशन झाल्यानंतर विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी अजिंक्य राऊत या नव्या अभिनेत्याची निवड झाली.


विठूमाऊली या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून स्टार प्रवाहवर 30 ऑक्टोबरपासून नवं पर्व सुरू झालं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूमाऊली दररोज तिन्हीसांजेला घराघरांत दर्शन होत आहे. वेगळं कथानक, भव्यता सादरीकरण आणि उच्च निर्मितीमूल्यांमुळे ही मालिका महाराष्ट्राच्या आणि विठ्ठलभक्तांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेद्वारे अजिंक्य राऊत या नवोदित अभिनेत्याला विठूमाऊली साकार करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. त्याच्या अभिनय प्रवासातली ही सर्वांत मोठी भूमिका आहे.


अजिंक्यच्या निवडीबद्दल मालिकेचे निर्माते महेश कोठारे म्हणाले, ‘विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी आम्हाला नवा चेहरा हवा होता. कारण, प्रेक्षकांना माहित असलेल्या अभिनेत्याला प्रेक्षक विठूमाऊली म्हणून कसं स्वीकारतील हा प्रश्न होता. त्यामुळे या भूमिकेसाठी आम्ही नव्या अभिनेत्याचा शोध घेत होतो. जवळपास ५५० ऑडिशन्स घेऊन झाल्या. तरीही हवा तसा अभिनेता सापडत नव्हता. त्यावेळी आमची टीम पंढरपूरला गेली आणि विठूमाऊलीच्या पायावर डोकं ठेवून ‘विठूमाऊली सापडू दे’ असं साकडं घातलं. त्यानंतर आमची टीम मुंबईला परतली आणि ऑडिशनमध्ये आम्हाला अजिंक्य राऊत हा अभिनेता सापडला. अजिंक्य हा उत्तम अभिनेता आहेच; मात्र त्याचे डोळे बोलके आहेत. त्याचं दिसणंही विठूमाऊलीला साजेसं होतं.’


महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची भव्यदिव्य कहाणी पहा ‘विठूमाऊली’ या मालिकेत सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

‘पावनी’च्या भूमिकेत मीरा जोशीची ‘कुलस्वामिनी’मध्ये एंट्री

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतील आरोही आणि राजस यांचं नातं त्यांच्या विरोधात होणाऱ्या कारस्थानांना तोंड देत तावून सुलाखून निघत आहे. आता पुन्हा या नात्यात दुरावा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अभयची गर्लफ्रेंड असलेली पावनी या मालिकेत एंट्री घेत आहे. अभिनेत्री मीरा जोशी ‘पावनी’ची भूमिका साकारत आहे. या नव्या एंट्रीनं कुलस्वामिनी या मालिकेत नवं आणि रंगतदार वळण येणार आहे.राजस आणि आरोही यांच्यातल्या नात्यानं सुवर्णा काकू अस्वस्थ आहे. काकूला या दोघांचा काटा काढायचा आहे. मात्र, कितीही कारस्थानं केली, तरी त्यात ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. रेणुका देवीच्या कृपेने अभय बरा झाला आहे. त्याला समजतं की खरं तर राजस आणि आरोहीचं लग्न झालं आहे, म्हणून आरोहीपासून दूर जाण्यासाठी अभय स्वतःला व्यवसायात गुंतवून घेतो. त्यादरम्यान त्याची भेट होते पावनीबरोबर; काही काळानं पावनी अभयची गर्लफ्रेंड असल्याचं सांगत देवधर कुटुंबात प्रवेश करते. पावनीच्या देवधर कुटुंबातील प्रवेशामागे अभयचा काही डाव आहे का, पावनी राजस आणि आरोहीच्या नात्यात काही दुरावा आणणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.आपल्या विरोधात होत असलेल्या कारस्थानांना आरोही कशा पद्धतीनं सामोरी जाते, रेणुका देवी आरोहीला कशा प्रकारे सहाय्य करते, पावनीच्या येण्यानंतरही तिचं आणि राजसचं नातं कायम टिकून राहणार का हे जाणून घेण्यासाठी, पहा कुलस्वामिनी सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित, ‘बबन’ २९ डिसेंबर रोजी प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ नंतर नवीन कलाकृती…

‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हे आता ‘बबन’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. बबन या चित्रपटातून एका महत्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा ते रंगविणार आहेत. या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले आहे.

https://www.youtube.com/embed/lzp0QW6jusk

या चित्रपटातील ‘साज ह्यो तुझा’ हे अप्रतिम गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून या गाण्याला उत्तमोत्तम कमेंट्स आणि साडेतीन लाखाहून अधिक मिळणाऱ्या लाईक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे.

https://www.youtube.com/embed/KBN-ghw-Zfc

‘फुल ऑन एंटरटेनमेंट’ अशा ‘बबन’ या चित्रपटाची प्रस्तुती ‘चित्राक्ष निर्मितीने’ केली आहे. ‘ख्वाडा’ फेम भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटामधून पदार्पण करणारी ‘फ्रेश लूक’ची अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यासह शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, सीमा समर्थ, कृतिका तुळसकर, मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बबन’ हा चित्रपट येत्या २९ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तरल प्रेमाचे नवे आयाम मांडून प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा ‘बबन’ प्रेक्षणीय ठरणार आहे हे नक्की.

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित, ‘बबन’ २३ मार्च रोजी प्रदर्शित


राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ नंतर नवीन कलाकृती…

‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे हे आता ‘बबन’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. बबन या चित्रपटातून एका महत्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा ते रंगविणार आहेत. या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले आहे.

https://www.youtube.com/embed/lzp0QW6jusk

या चित्रपटातील ‘साज ह्यो तुझा’ हे अप्रतिम गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून या गाण्याला उत्तमोत्तम कमेंट्स आणि साडेतीन लाखाहून अधिक मिळणाऱ्या लाईक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे.

https://www.youtube.com/embed/KBN-ghw-Zfc

‘फुल ऑन एंटरटेनमेंट’ अशा ‘बबन’ या चित्रपटाची प्रस्तुती ‘चित्राक्ष निर्मितीने’ केली आहे. ‘ख्वाडा’ फेम भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटामधून पदार्पण करणारी ‘फ्रेश लूक’ची अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यासह शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, सीमा समर्थ, कृतिका तुळसकर, मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बबन’ हा चित्रपट येत्या २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तरल प्रेमाचे नवे आयाम मांडून प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा ‘बबन’ प्रेक्षणीय ठरणार आहे हे नक्की.


Originally published at Marathi PR.

स्वप्नील जोशीची पहिली सिरीयल निर्मिती ‘नकळत सारे घडले’

अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडले’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो. या प्रोमोला सोशल मीडियामध्ये उदंड प्रतिसाद मिळत असून, हा प्रोमो स्वप्नीलने ट्विटही केला. सिने आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील, स्वप्निलच्या मित्रमंडळींनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वप्नीलने अर्जुन सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेत सहभागी होत, या मालिकेची निर्मिती केली आहे.

स्टार प्रवाहनं आपल्या मालिकांमधून कायमच नवे आणि वेगळे विषय सादर केले आहेत. ‘नकळत सारे घडले’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. या मालिकेचा नुकताच लाँच केलेल्या प्रोमोचा लुक एकदम फ्रेश आहे. छोटी मुलगी, तिचे बाबा आणि डॉक्टर आंटी यांच्यातलं विलक्षण नातं यात पहायला मिळत आहे. लोकप्रिय मालिकांमुळे परिचित असलेले हरीश दुधाडे आणि नुपूर परूळेकर या प्रोमोमध्ये दिसत असून बाल कलाकार सान्वी रत्नलिकरचे लोभस, गोड दिसणे लक्षणीय आहे. मात्र, मालिकेच्या कथानकाचा अद्याप उलगडा झाला नाही.

टेलिव्हिजनवर निर्माता म्हणून पदार्पण करण्याबाबत स्वप्नील म्हणाला, “निर्मिती करण्याचा विचार बऱ्याच काळापासून माझ्या मनात होता. अर्जुन सिंह बरन आणि कार्तिक निशानदार यांच्या जीसीम्स या निर्मिती संस्थेला मी सहभागी झालो. माझं आणि स्टार प्रवाहचं जुनं नातं आहे. म्हणूनच, स्टार प्रवाहबरोबर मालिका करायला मी खूप कम्फर्टेबल होतो. ‘नकळत सारे घडले’ या रोमँटिक मालिकेच्या रुपानं हा विचार प्रत्यक्षात आला आहे. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. तसंच या माझ्या नव्या कलाकृतीवरही करतील याची खात्री आहे.”

स्वतःला स्वतःच्याच प्रेमात पाडणारा ‘हंपी’ ट्रेलर

‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं ! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’ ! या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय अशा अभिनव आणि प्रभावी कल्पनांमुळेच मराठी चित्रपट सृष्टीची उच्च अभिरुची अधोरेखित होत आली आहे.
‘हंपी’, या नवीन कलाकृतीचं ‘ग्लॅमरस’ आणि ‘फ्रेश-लूक’ असलेलं पोस्टर आणि टिझर आत्तापर्यंत सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ आणि ‘म्युझिक लाँच’ सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखात पार पडला. वैभव जोशी आणि ओंकार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गीतांना, नरेंद्र भिडे आणि आदित्य बेडेकर यांनी संगीत साज चढविला आहे.


चित्रपटात निराशाग्रस्त ईशा (सोनाली कुलकर्णी) ट्रिप म्हणून हंपीला येते आणि तिचं आयुष्यच आमूलाग्र बदलते. मुळात ती हंपीला का जाते, तिथे ती काय करते, तिला तिथे कोण आणि कसे लोक भेटतात याची उत्तरं अर्थातच यथावकाश १७ नोव्हेंबरला प्रेक्षकांना मिळतील.

https://www.youtube.com/embed/Ytpr_u3gPzw?rel=0

ईशा, हंपी मधल्या माणसांमुळे बदलते की हंपी मुळे बदलते हा कुतूहलाचा विषय जरी असला तरी World Heritage चा दर्जा असलेले हंपी हे ठिकाण कोणालाही प्रेमात पडायला लावणारे असे आहे. हंपी ही प्रेमकथा आहे की इतरांपेक्षा स्वतःलाच स्वतःच्या प्रेमात पाडणारी कलाकृती आहे, की या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ आहे हे अदिती मोघे यांच्या सुंदर कथा-पटकथा-संवाद आणि प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनातून उलगडत जाईल. प्रकाश कुंटेच्या आधीच्या कलाकृतींना प्रेक्षकांनी मनापासून पसंती दिली होती आणि आता प्रेक्षक त्याच्या नव्या कलाकृतीची वाट पाहत आहेत.‘स्वरूप समर्थ एंटरटेनमेंट’ निर्मित आणि अमोल जोशी प्रॉडक्शन, ‘स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडीया प्रा. लि.’, योगेश भालेराव निर्मित; आकाश पेंढारकर, सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार प्रस्तुत,हंपी या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, छाया कदम अशी तगडी आणि ग्लॅमरस स्टारकास्ट आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांनी दिलेआहे, अमलेंदू चौधरी यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारे छायांकन केले आहे. संकलन प्राची रोहिदास, तर कला-दिग्दर्शन पूर्वा पंडित यांचे आहे. ध्वनी आरेखन, कार्तिक कुलकर्णी आणि आदित्य यादव यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर, वेशभूषा सायली सोमण आणि रंगभूषा विनोद सरोदे यांची आहे. लाईन प्रोड्युसर म्हणून सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे.


येत्या १७ नोव्हेंबरला हंपी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल आणि प्रेक्षकांना पाहता पाहता हंपीला घेऊन जाईल.