सचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बापजन्म’चा टिझर प्रदर्शित

प्रत्येकजण निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची झलक पाहण्याची प्रतिक्षा करत असताना नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. जितकी प्रतिक्षा या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी केली त्याहून जास्त गूढ या चित्रपटामध्ये लपलेले आहे असे जाणवते. मनोरंजनसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते सचिन खेडेकर यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बापजन्म’ हा त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. […]

‘बापजन्म’ हा निपुण धर्माधिकारीचा सिनेमा १५ सप्टेंबरपासून

युवा आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बापजन्म’ १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, सुमतीलाल शाह व ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्स’तर्फे ही घोषणा करण्यात आली. ‘बापजन्म’ची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी […]