‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम

चित्रपटातील भूमिका वस्तुदर्श आणि स्वाभाविक वाटावी म्हणून आज कलाकार कितीही मेहनत करायला व त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक अलिकडील अनुभव म्हणजे मुक्ता बर्वे ने ‘आम्ही दोघी’साठी केलेली तयारी म्हणजे या चित्रपटासाठी ती चक्क विणकाम शिकली आहे. चित्रपटाची कथा दोन स्त्रीयांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर बेतली आहे. यातील अमला नावाच्या मुक्ताच्या व्यक्तिरेखेसाठी […]

सचिन खेडेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बापजन्म’चा टिझर प्रदर्शित

प्रत्येकजण निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाची झलक पाहण्याची प्रतिक्षा करत असताना नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. जितकी प्रतिक्षा या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी केली त्याहून जास्त गूढ या चित्रपटामध्ये लपलेले आहे असे जाणवते. मनोरंजनसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते सचिन खेडेकर यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बापजन्म’ हा त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. […]

‘बापजन्म’ हा निपुण धर्माधिकारीचा सिनेमा १५ सप्टेंबरपासून

युवा आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बापजन्म’ १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, सुमतीलाल शाह व ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्स’तर्फे ही घोषणा करण्यात आली. ‘बापजन्म’ची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी […]

श्रेयस जाधव ची ‘फकाट पार्टी’ लवकरच

जसराज जोशीसोबत आम्ही पुणेरी हे रॅप गायल्यानंतर याच मराठी ढंगात श्रेयस पुन्हा एकदा ‘फकाट पार्टी’ द्यायला येत आहे. हे नवे गाणे पार्टी सॉंग असणार आहे. या गाण्यात तब्बल १०० ग्लॅमरस मॉडेल्स असणार आहेत. त्यात काही फाॅरेनर्सचाही समावेश आहे. श्रेयशने आतापर्यंत ‘आम्ही पुणेरी’ आणि ‘वीर मराठे’ या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्टफुल ‘रॅप’ चे स्वरूप लोकांसमोर सादर […]