तमाशातला नाच्या येतोय स्टार प्रवाहवर!

‘गोठ’ मालिकेत सिद्धेश्वर झाडबुके साकारणार बाबी मामाची भूमिका तमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत नाच्याची एंट्री होणार […]

नकुशी, गोठ मालिकांमध्ये वटपौर्णिमेची पूजा

वटपौर्णिमा म्हणजे प्रत्येक सुवासिनीसाठी महत्त्वाचा सण. पतीसह असलेलं नातं सात जन्म रहावं, हे मागणं मागण्याचा हा दिवस. त्यातही लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा अगदीच स्पेशल असते. स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेतील नकुशी आणि ‘गोठ’ मालिकेतील राधा पहिल्यांदाच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेत. मात्र, वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर त्यांच्या आयुष्याची नवी नांदी होणार आहे. नकुशी आणि राधा यांच्या आयुष्यात काय बदल होणार […]