‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चे नाबाद ३००

कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील, अक्षय आणि प्रणोतीची गोष्ट सांगणारे, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक लवकरच ३०० व्या प्रयोगाचा महत्वपूर्ण टप्पा गाठणार आहे. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ करणाऱ्या या नाटकाचा, ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये, रविवार, दि. १२ रोजी त्रिशतक महोत्सवी प्रयोग रंगणार आहे. पती-पत्नीच्या स्ट्रेसफुल आणि तितक्याच गोजिऱ्या नात्यावर भाष्य करणारे […]

“सोनूsss”…तुझा ‘एक’च प्याला? वर भरोशा नाय का…

“सोनूsss”… असं कोणी म्हटलं तर आपसूकच “तुझा मायावर भरोसा नाय काय?” हे शब्द ओठावर येतात.कारण सध्या याच गाण्याची क्रेझ तरुणांमध्ये आहे. विविध भाषांमध्ये या गाण्याचे व्हर्जन आलेत मग आपले मराठी कलाकार तरी कसे पाठी राहतील. सध्या रंगभूमीवर गाजणार नाटक म्हणजे आचार्य अत्रे, लिखित विडंबन ‘एक’च प्याला? . या नाटकातील कलाकारांनी सुद्धा या गाण्याचा आधार आपल्या नाटकांच्या […]

डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘अर्धसत्य’चा फर्स्ट लूक

हल्ली आपण पाहतोय की मराठी रंगभूमीवर विविध विषय हाताळले जात आहेत आणि नाटकांची संख्यादेखील वाढत आहे. आपल्या कणखर अभिनयाने मराठी रंगभूमी पण गाजवणारे डॉ. अमोल कोल्हे आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर एका नव्या नाटकाच्या माध्यमातून अवतरणार आहेत. शार्गी प्रॉडक्शन निर्मित ‘अर्धसत्य’ हे नवंकोरं नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. प्रसाद दाणी लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित […]

“डोण्ट वरी Be Happy” चे नाबाद २०० प्रयोग

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या “डोण्ट वरी Be Happy” या नाटकानं २०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आताच्या बहुमाध्यमांच्या काळात एखाद्या नाटकाचे २०० प्रयोग होणं ही नक्कीच गौरवाची बाब आहे. हे नाटक म्हणजे अनेक जोडप्यांसाठी कौन्सेलर ठरलं आहे. अलीकडच्या काळात पती-पत्नीच्या नात्यावर आधारित अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली. कौटुंबिक नाटकाची संकल्पना बाजूला […]