स्वप्निल जोशीच्या ‘भिकारी’ सिनेमाचं म्यूझिक लॉन्च

भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डिरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देवोल, श्रेयस तळपदे आदी ‘गोलमाल अगेन’चे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी पहायला मिळणार आहे. स्वतः गणेश आचार्य कोरिओग्राफर असल्याने फिल्ममधील गाणी हेच या सिनेमाचं खास वैशिष्ट्य असणार […]

‘बॉईज’ चित्रपट — ८ सप्टेंबरपासून प्रदर्शित

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा ‘बॉईज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालेला आहे. येत्या यूथ फेस्टिवल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असे सुरुवातीपासून सांगण्यात आले होते आणि नुकतीच या चित्रपटाच्या टीमने प्रदर्शित तारीख एका नव्या कोऱ्या पोस्टरच्या माध्यमातून जाहिर केली आहे. पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता, प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची विचार करण्याची अनोखी पद्धत असे बरेच […]

‘बॉईज’चा डबल धमाल पहिला टीझर प्रदर्शित

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा ‘बॉईज’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर या सिनेमाचा टिझर लाँच करण्यात आला. या सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक यांच्या सहाय्याने प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते यांनी आपल्या फेसबुक आणि युट्युबवर ‘बॉईज’ चा टिझर लाँच केला. https://www.youtube.com/embed/2_ryg_Ru6zM पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता, प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची विचार करण्याची अनोखी पद्धत असे बरेच काही […]

शेंटिमेंटलचा ट्रेलर प्रदर्शित!

नोकरी मग ती खाजगी असो, सरकारी असो, निमसरकारी असो प्रत्येक ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखणं, ‘वर्क लोड’ पायी घरच्यांकडे दुर्लक्ष करणं, ‘डेड लाईनचा’ स्ट्रेस हे सगळं आलंच ! पण जे काम करतोय त्यात पॅशन, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची वृत्ती असेल तर मग येणारा प्रत्येक दिवस ‘शेंटिमेंटल’ वाटायला लागतो. असे पॅशनेट, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे शेंटिमेंटल […]

‘कच्चा लिंबू’ चा टीजर प्रदर्शित!

‘साध्या माणसांची स्पेशल गोष्ट’ या आगळ्या वेगळ्या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपण सगळेच सुखाच्या शोधात असतो. साध्या सरळ अपेक्षा असतात आयुष्याकडून, पण कधी कधी वरच्याच्या मनात आपल्यासाठी काही वेगळेच प्लॅन असतात आणि मग अचानक हे साधं, सरळ वाटणारे आयुष्य स्पेशल होऊन जाते. या अनपेक्षितपणे आलेल्या […]

कच्चा लिंबू चे मोशन पोस्टर प्रदर्शित

“कच्चा लिंबू”चे मोशन पोस्टर प्रदर्शित — कच्चा लिंबू साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सोनाली कुलकर्णी एका साध्या गृहिणीच्या भूमिकेत, सचिन खेडेकरांचा आनंदी आणि फ्रेश लुक, रवी जाधव यांची अभिनेता म्हणून नवी ईनिंग, तसेच आपल्या कुटुंबाची आणि चित्रपटातील इतर पात्रांची साध्या सोप्या निवेदनातून करून दिलेली ओळख, प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, Black & White आणि उत्कंठा वाढवणारा ‘कच्चा लिंबू’ या […]

प्रेमाच्या प्रवासाचा पहिला थांबा, भेटली तू पुन्हाचा टीझर प्रदर्शित!

दूर डोंगरपल्याड उंच मनोऱ्यात एखादी राजकुमारी प्राण कंठाशी आणून आपली वाट बघत असेल आणि आपण तिची सुटका करू किंवा दुरून कुठूनसा एक राजकुमार घोड्यावर बसून दुडकत, दुडकत येईल आणि आपल्याला घेऊन जाईल अशी स्वप्न आपण प्रत्येकच जण कधी ना कधीतरी बघतो. आजच्या प्रॅक्टिकल जगात ही अगदीच परीकथेतली स्वप्नं वाटली तर मग लांबवर पसरलेल्या पिवळ्या मोहरीच्या […]

‘मला काहीच Problem नाही!’ चा फर्स्ट लूक

गेले काही दिवस स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी सतत म्हणत आहेत की त्यांना ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’. पण कसला प्रॉब्लेम, नेमकं काय झालंय याचा अंदाज प्रेक्षकांना काय बांधता येत नाहीये. पण आता कदाचित तुम्हाला या संबंधित कल्पना येईल कारण नुकतेच या चित्रपटाच्या टीमने ‘मला काहीच Problem नाही!’ चा फर्स्ट लूक सोशल मिडीयावर प्रदर्शित केला आहे. […]

अखेर ‘बॉईज’चे पोस्टर लाँच

गेले अनेक दिवस ‘बॉईज’ या सिनेमाच्या पोस्टरमधील त्या तीन ‘बॉईज’ बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सिनेमाच्या टीजर पोस्टरवर पाठमोरी उभी असणारी ही तीन मुलं नेमकी कोण आहेत? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला. पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये नुकताच झालेल्या ‘बॉईज’च्या पोस्टर लाँच समारंभात याचा उलगडा झाला. ही तीन मुले म्हणजेच पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि […]

पहिल्या नजरेत प्रेमात पाडणारे ‘भेटली तू पुन्हा’चे प्रेमळ मोशन पोस्टर

“जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही… आपल्याला फक्त साईन सापडलं पाहिजे…”, असे सांगत ‘भेटली तू पुन्हा’ चित्रपटाच्या टीमने ऑफिशिअल पोस्टर प्रदर्शित केले होते आणि आता या चित्रपटाचे मोशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ऍक्शन-ड्रामा-लव्ह स्टोरी असलेला ‘दगडी चाळ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर चंद्रकांत कणसे एक नवीन हटके लव्हस्टोरी ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन […]