“सोनूsss”…तुझा ‘एक’च प्याला? वर भरोशा नाय का…

“सोनूsss”… असं कोणी म्हटलं तर आपसूकच “तुझा मायावर भरोसा नाय काय?” हे शब्द ओठावर येतात.कारण सध्या याच गाण्याची क्रेझ तरुणांमध्ये आहे. विविध भाषांमध्ये या गाण्याचे व्हर्जन आलेत मग आपले मराठी कलाकार तरी कसे पाठी राहतील. सध्या रंगभूमीवर गाजणार नाटक म्हणजे आचार्य अत्रे, लिखित विडंबन ‘एक’च प्याला? . या नाटकातील कलाकारांनी सुद्धा या गाण्याचा आधार आपल्या नाटकांच्या […]

डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘अर्धसत्य’चा फर्स्ट लूक

हल्ली आपण पाहतोय की मराठी रंगभूमीवर विविध विषय हाताळले जात आहेत आणि नाटकांची संख्यादेखील वाढत आहे. आपल्या कणखर अभिनयाने मराठी रंगभूमी पण गाजवणारे डॉ. अमोल कोल्हे आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर एका नव्या नाटकाच्या माध्यमातून अवतरणार आहेत. शार्गी प्रॉडक्शन निर्मित ‘अर्धसत्य’ हे नवंकोरं नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे. प्रसाद दाणी लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित […]

“डोण्ट वरी Be Happy” चे नाबाद २०० प्रयोग

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या “डोण्ट वरी Be Happy” या नाटकानं २०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आताच्या बहुमाध्यमांच्या काळात एखाद्या नाटकाचे २०० प्रयोग होणं ही नक्कीच गौरवाची बाब आहे. हे नाटक म्हणजे अनेक जोडप्यांसाठी कौन्सेलर ठरलं आहे. अलीकडच्या काळात पती-पत्नीच्या नात्यावर आधारित अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली. कौटुंबिक नाटकाची संकल्पना बाजूला […]

‘गेला उडत’ नाटकाचे १५० यशस्वी प्रयोग

जेव्हा एखाद्या नाटकाच्या प्रयोगाच्या संख्येत वाढ होते तेव्हा हमखास समजून जायचे की ते नाटक नि त्या नाटकातील कलाकारांनी साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. असाच एक सुंदर अनुभव ‘गेला उडत’ टीमने अनुभवला आहे. नुकतेच ‘गेला उडत’ नाटकाने यशस्वी १५० प्रयोग पूर्ण करुन प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन करण्याच्या तयारीला लागले आहे. थर्ड बेल एंटरटेनमेंट आणि भद्रकाली प्रॉडक्शन […]

“एक शून्य तीन” नाटकाचे दिमाखदार ५० प्रयोग

ज्येष्ठ दिग्गज कलाकार एकत्र आले “एक शून्य तीन” नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगाच्या निमित्ताने… “एक शून्य तीन” एक ज्वलंत, उत्कांठावर्धक रहस्यमय नाटक. ६ मे रोजी या नाटकाचा पन्नासावा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर येथे संपंन्न झाला. या निमित्ताने सन्माननीय अशोक सराफ, नाना पाटेकर, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, महेश कोठारे, उदय टिकेकर, सचिन पिळगांवकर, यांसारख्या दिग्गज मंडळींनी आवर्जून उपस्थित […]

सुमीत राघवनचा एक वाढदिवस असाही…

नाटक “एक शून्य तीन” चा एक नेहमीप्रमाणेच ठरलेला प्रयोग शनिवार २२ एप्रिल दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे.“एक शून्य तीन” आशयघन नाट्यकृती… नवोदित दिग्दर्शकांचा प्रयोगशील प्रयत्न…स्वानंदी टिकेकरचं पहिलंच नाटक…सामाजिक संदेश देण्याचा यथायोग्य प्रयत्न करून प्रेक्षकांच्या हमखास पसंतीस पडलेलं यापलीकडे ह्या नाटकाचं आणखी एक विशेष सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे “सुमीत राघवन” ह्यांचा सहज सुरेख अभिनय…तसं पाहिलं […]