नम्रता प्रधान कशी झाली ‘छत्रीवाली’

स्टार प्रवाहवर १८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद… छत्रीवाली ही तुझी पहिलीच मालिका, या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली? लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या […]

‘शतदा प्रेम करावे’मध्ये रंगणार महानाट्य

स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेत एक वेगळं वळण आलं आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रुपानं एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचं होणारं लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उध्वस्त करण्याची धमकी […]

स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’

स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘छत्रीवाली’… नाव जितकं हटके आहे तितकीच हटके आहेत यातली पात्रसुद्धा… ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या […]

स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा

मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा स्टार प्रवाहवर १० जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. हा मराठी मनोरंजनाचा तडका नक्की अनुभवावा असाच आहे. अर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे आयोजित संस्कृती कला दर्पण सोहळ्यात यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा […]

भव्यदिव्य सोहळ्यात पंढरपूरमध्ये अवतरली ‘विठू माऊली’

आजवर स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न मालिका सादर केल्या आहेत. ‘विठू माऊली’ या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकत आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहित नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडणार आहे. तसंच विठ्ठलाच्या अवतारानं ही जगाची माऊली कशी झाली, […]

‘दुहेरी’मध्ये परतलेली मैथिली आहे की सोनिया?

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय ‘दुहेरी’ या मालिकेच्या कथानकानं वेगळंच वळण घेतलं आहे. मैथिलीचा खून झाल्यानंतर अल्पावधीतच तिच्यासारखीच दिसणारी मुलगी सूर्यवंशी कुटुंबात आली आहे. ती स्वत:ला सोनिया कारखानीस असल्याचं सांगत असली, तरी ती खरी कोण आहे, यावर सूर्यवंशी कुटुंबाचा विश्वास बसलेला नाही. बल्लाळ आणि परसूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धडपडणाऱ्या मैथिलीला परसूनं संपवलं. खूनानंतर त्यानं तिला लगेच […]

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार ‘विठूमाऊली’

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार ‘विठूमाऊली’- स्टार प्रवाहवर नवी मालिका लवकरच अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल जनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची […]

तमाशातला नाच्या येतोय स्टार प्रवाहवर!

‘गोठ’ मालिकेत सिद्धेश्वर झाडबुके साकारणार बाबी मामाची भूमिका तमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. स्टार प्रवाहच्या गोठ या मालिकेत नाच्याची एंट्री होणार […]

स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’मध्ये होणार उषा नाडकर्णी यांची एंट्री

जवळपास चार दशकं आपल्या समर्थ अभिनयानं मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोटा पडदा गाजवलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची स्टार प्रवाहवरील ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेत येत्या आठवड्यात एंट्री होणार आहे. त्यांच्या प्रवेशाने मालिकेचं कथानक नव्या वळणावर येणार आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेचे तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत. अत्यंत वेगळ्या विषयावरील ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेनं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला आहे. सकस […]

लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ?

लग्नाच्या वाढदिवशी ती आपली खरी ओळख सांगणार ? – स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत येणार अनवट वळण नावात काय असतं, असं म्हटलं जातं. मात्र, नाव हीच खरी ओळख असते. नाव लपवून बदललेल्या ओळखीनं काय घडू शकतं हे स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेत पहायला मिळतं. मात्र, आपली खरी ओळख नवऱ्याला, दुष्यंतला सांगण्याचा विचार मैथिलीनं केला आहे.वाढदिवसाच्या दिवशी सत्य सांगण्याचा […]